श्रमदानासाठी अालिया, किरण राव आमिरसोबत थेट शेताच्या बांधावर

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन

राज्यातील दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी अामिर खान व त्याची पत्नी किरण राव पाणी फाैंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. सद्याच्या कालावधीत राज्यातील 75 तालुक्यांमध्ये पाणी फाैंडेशनचे काम सुरू आहे. 1 मे महाराष्ट्र दिन या दिनाचे आैचित्य साधत अनेक हिंदी कलाकार मंडळीसह मराठी कलाकार मडळींनी महाश्रमदान केलं.

यामध्ये आमिर खान, किरण राव अभिनेत्री आलिया भट, सई ताम्‍हणकर, जितेंद्र जोशी यांनी सहभाग घेतला. सई ताम्हणकरने पुरंदरमध्‍ये श्रमदानात सहभाग घेतला. शिवाय, अभिनेते अनिता दाते, गिरीश कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, अमेय वाघ यांनी श्रमदान केले. या सर्व कलाकार मंडळींनी सोशल मीडियावरून या श्रमदानाची माहिती दिली आहे.