Reliance Jio ची मोठी घोषणा ! नववर्षानिमित्त ग्राहकांना दिलं जबरदस्त ‘गिफ्ट’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने ( Reliance Jio) नववर्षानिमित्त आपल्या ग्राहकांना जबरदस्त भेट दिली आहे.
कंपनीतर्फे 1 जानेवारी 2021 पासून देशात सर्व नेटवर्कसाठी पुन्हा एकदा विनामूल्य कॉलिंग सेवा करण्यात आली आहे. रिलायन्स जिओने गुरुवारी (दि.31) याबाबतची माहिती दिली आहे.

जिओने IUC म्हणजेच interconnect usage charges पूर्णपणे बंद केले आहेत. त्यामुळे जिओच्या ग्राहकांना आता उद्यापासून म्हणजेच 1 जानेवारी 2021पासून कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंग करता येणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (TRAI) निर्देशानुसार, देशात 1 जानेवारी 2021 पासून Bill and Keep नियम लागू होणार आहे. त्यामुळे IUC चार्ज संपणार आहे.

सप्टेंबर 2019 मध्ये IUC चार्ज आकारायला सुरूवात केल्यानंतर जिओने ज्यावेळी ट्राय आययुसी चार्ज संपवेल तेव्हा आम्हीही युजर्सकडून आययुसी चार्ज आकारणार नाही असे स्पष्ट केले होते. आता ट्रायने 1 जानेवारीपासून आययुसी चार्ज न आकारण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार जिओनेही ग्राहकांना पुन्हा एकदा विनामुल्य कॉलिंगची सेवा मिळेल असे स्पष्ट केले आहे. सध्या जिओकडून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी IUC चार्ज आकारला जातो. यासाठी जिओ दर मिनिटाला 14 पैसे आकारत होती, नंतर 7 पैसे आकारले जात होते. पण आता हा चार्ज हटवण्यात आला असून विनाशुल्क कॉलिंग 1 जानेवारीपासून करता येणार आहे.