Allu Arjun | अभिनेता अल्लू अर्जुन लवकरच दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या आगामी चित्रपटात झळकणार; चित्रपटाचे नाव मात्र गुलदस्तात

पोलीसनामा ऑनलाइन टीम : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनने (Allu Arjun) त्याच्या अभिनयामुळे आज लोकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटामुळे त्याला जास्तच प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या स्टाईलने सर्वांनाच वेड लावले होते. आता प्रेक्षकांना या चित्रपटाच्या पुढच्या भागाची उत्सुकता लागली आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटांमध्ये अल्लू अर्जुन सह रश्मिका मंदाना, फहाद फासिल असे कलाकार झळकले होते. आता ‘पुष्पा द रुल’ची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहत आहेत. सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणांमध्ये अभिनेता व्यस्त आहे. येत्या काही महिन्यांमध्येच ‘पुष्पा २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधी अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

‘अर्जुन रेड्डी’, ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन (Allu Arjun) हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती टी सीरिजचे मालक भूषण कुमार करणार आहेत. या चित्रपटाबाबत चर्चा करण्यासाठी अल्लू अर्जुन, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा, भूषण कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली. याची अधिकृत माहिती टी सीरिजच्या instagram अकाउंट वरून शेअर करण्यात आली आहे.

अजून तरी या आगामी चित्रपटाचे नाव समोर आलेले नाही. मात्र लवकरच चित्रपटाचे नाव जाहीर केले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भूषण कुमार यांनी याआधी देखील बऱ्याचशा पॅन इंडिया चित्रपटाची निर्मिती केली आहे.
येणारा चित्रपट देखील पुष्पा प्रमाणे पॅन इंडिया असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हे रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ या आगामी चित्रपटाच्या कामांमध्ये सध्या व्यस्त आहेत.

Web Title :- Allu Arjun | allu arjun director sandeep reddy vanga producer bhushan kumar announce new pan india movie

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Solapur Crime News | रस्त्याच्या कडेला थांबणं बेतले जीवावर; टँकरखाली चिरडून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

Pune Crime News | ‘चोरटे’ही ‘रंगले’ कसबा निवडणुकीच्या रणधुमाळीत; जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरीच्या गुन्ह्यात घट

ACB Trap On Executive Engineer Mahesh Patil | 43 लाखांची लाच मागणारा सार्वजनिक
बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता साडेतीन लाख घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात