Allu Arjun | अल्लू अर्जुनने केला पुष्पा 2 चित्रपटाचा डायलॉग रिव्हिल;  यावेळी पुष्पा फ्लॉवर नाहीतर आहे…

पोलीसनामा ऑनलाइन – Allu Arjun | दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट ‘पुष्पा’ चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. 2021 साली प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ (Pushpa The Rise) चित्रपटाने देशभऱ बक्कळ कमाई केली होती.

चित्रपटाचा पुढील सिक्वेलची म्हणजेच ‘पुष्पा 2’ (Pushpa 2: The Rule) ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही महिन्यांपूर्वी ‘पुष्पा 2’ चे पोस्टर आऊट (Pushpa 2 Poster Out) करण्यात आले. यामध्ये पुष्पाची प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) निळ्या रंगाच्या अवतारामध्ये दिसून आला होता. त्याचा हा लूक आऊट झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये पुष्पा 2 चित्रपटाबाबत उत्सुकता आहे.

आता अभिनेता अल्लू अर्जुनने(Allu Arjun)  पुष्पा 2 मधील खास डायलॉग (Pushpa 2 Dialogue) लीक केला असून लोकांसमोर बोलून दाखवला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 https://www.instagram.com/p/CtgebqQhBiW/?igshid=MzRlODBiNWFlZA==
 https://www.instagram.com/p/CqznFajSbr_/?igshid=MzRlODBiNWFlZA==

‘पुष्पा’ चित्रपटातील पुष्पा अर्थात अल्लू अर्जुन व श्रीवल्ली अर्थात रश्मिका मंदाना (Pushpa And Srivalli) य़ांची ऑन स्क्रीन कॅमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. चित्रप़टातील सामंथा रुथ प्रभूने (Samantha Ruth Prabhu) केलेल्या गाण्याने आग लावली होती. एंटरटेनमेंटचे फुल पॅकेज असलेला ‘पुष्पा’ चित्रपटाने करोडो रुपयांचा गल्ला कमावला होता.

चित्रपटातील ‘पुष्पा नाम समझकर फ्लावर समझे क्या फायर हूं मैं फायर’ हा डायलॉग खूप गाजला होता. प्रत्येकाच्या मुखात असलेल्या या डायलॉगचे वेड प्रेक्षकांना लागले होते. आता ‘पुष्पा 2’ चित्रपटामध्ये देखील जसा जबरदस्त डायलॉग असणार आहे. तो डायलॉग अल्लू अर्जुनने रिव्हिल (Pushpa 2 Dialogue Reveal) केला आहे.

 https://www.instagram.com/p/CkGbh2apR3Z/?igshid=MzRlODBiNWFlZA==
 https://www.instagram.com/p/CiWhxoeLnTx/?igshid=MzRlODBiNWFlZA==
 https://www.instagram.com/p/CgmeoPRL4mF/?igshid=MzRlODBiNWFlZA==

एका कार्यक्रमा दरम्यान त्याने ‘पुष्पा 2’ चित्रपटातील दमदार डायलॉग बोलून दाखवला आहे. त्याने म्हणाले की, “ईदंरा जरिगिंदी औकात रूल मीड़ा जारगुताना दादी, पुष्पा गाड़ी रूल.” याचा मराठीमध्ये असा अर्थ होतो की, “ इथे फक्त एकच रुल चालतो आणि तो म्हणजे पुष्पाचा रुल“.  प्रेक्षकांच्या आग्रहामुळे अल्लू अर्जुनने त्यांच्या आगामी चित्रपटातील डायलॉग बोलून दाखवला. मात्र यामुळे पुष्पा 2 चित्रपटातील डाय़लॉग रिव्हिल झाला आहे. त्याची ही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/CYdeOYtBNaC/?igshid=MzRlODBiNWFlZA==
 https://www.instagram.com/tv/CWcv-ExBf-m/?igshid=MzRlODBiNWFlZA==

पुष्पा चित्रपटाच्या भरघोष यशानंतर ‘पुष्पा 2’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
यामध्ये देखील अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) 
व अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे एक पोस्टर देखील आऊट करण्यात आले आहे. यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून आता डायलॉग देखील रिव्हिल झाला आहे. ‘पुष्पा 2’ हा चित्रपट पुढच्या वर्षी 2024 ला प्रदर्शित (Pushpa 2 Release Date) होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | नळावरील भांडणात पोटावर लाथ मारल्याने महिलेचा गर्भपात;
लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाघोलीमधील घटना