Allu Arjun Pushpa 2 | प्रतिक्षा संपली! ‘या’ दिवशी रिलीज होणार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2: द रूल’ चित्रपट

पोलीसनामा ऑनलाइन – Allu Arjun Pushpa 2 | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ‘पुष्पा’ या 2021 साली प्रदर्शित झालेल्या अभिनेता अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. चित्रपटातील पुष्पाचे डायलॉग, गाणी आणि स्टाईल याची संपूर्ण देशामध्ये चर्चा होती. प्रत्येकाच्या तोंडामध्ये ‘झुकेंगा नहीं साला’ हा डायलॉग होता. ‘पुष्पा’ चित्रपटापासूनच प्रेक्षकांना ‘पुष्पा 2’ चित्रपटाची उत्सुकता लागली होती ‘पुष्पा 2: द रूल’ चित्रपटाचे काही पोस्टर आणि अल्लू अर्जुनचा खास लूक या आधीच आऊट करण्यात आला होता. प्रेक्षकांना ‘पुष्पा 2: द रूल’ चित्रपटाची रिलीज डेट जाणून घ्यायची होती. आता ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत ‘पुष्पा 2: द रूल’ ची रिलीज डेट जाहीर केली आहे. (Allu Arjun Pushpa 2)


https://www.instagram.com/p/CqxX0e-PPW1/?igshid=MzRlODBiNWFlZA==


https://www.instagram.com/p/CqvEgzAvXhW/?igshid=MzRlODBiNWFlZA=

देशभरामध्ये बहुचर्चित असलेला आणि बहुप्रतिक्षित असलेला ‘पुष्पा 2’ हा चित्रपट पुढच्या वर्षी अर्थात 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 2024 च्या स्वातंत्र दिनाच्या मुहूर्तावर ‘पुष्पा 2: द रूल’ हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2: द रूल’ चित्रपटातील लूक रिलीज (Allu Arjun Pushpa 2 Look) करण्यात आला होता. तो हटके अशा काली माताच्या रुपात दिसत होता. ‘पुष्पा’ चित्रपटातील पुष्पा अर्थात अल्लू अर्जुन आणि श्रीवल्ली अर्थात रश्मिका मंदाना (Pushpa And Srivalli) य़ांची जोडी सर्वांना खूप आवडली. या चित्रपटासाठी अभिनेता अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देखील जाहीर झाला आहे.

Advt.


https://www.instagram.com/p/Cvq-327v5Ww/?igshid=MzRlODBiNWFlZA==

आता या पुष्पा चित्रपटाचा सिक्वल ‘पुष्पा 2: द रूल’ (Pushpa 2: The Rule) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
चित्रपटाची रिलीज डेट 15 ऑगस्ट 2024 आऊट करण्यात आली आहे. एंटरटेनमेंटचे फुल पॅकेज असलेला ‘पुष्पा’
चित्रपटाने करोडो रुपयांचा गल्ला कमावला होता. या ‘पुष्पा 2: द रूल’ चित्रपटामध्ये देखील अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची
जोडी झळकणार आहे. तसेच यामध्ये विजय सेतुपती (Vijay Sethupathi), फहद फासिल (Fahadh Faasil), सुनील (Sunil)
आणि प्रियामणी (Priyamani) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार
यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

GST Fraud Case | कर चोरी प्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई; दोन व्यक्तींना अटक