फायद्याची गोष्ट ! केवळ 50 हजारात सुरू करा हा व्यवसाय अन् मिळवा लाखोंचा नफा, जाणून घ्या

नवी दिल्ली, ता. १७ : पोलीसनामा ऑनलाइन : गेल्या वर्षी चीनच्या वुहान शहरातून कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव सुरू होऊन जगभरात पोहचला. अनेक देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. एकीकडे जग कोरोना महामारीनं हैराण झालं होतं तर दुसरीकडे लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे व्यवसाय करायच्या विचारात असाल तर केवळ ५० हजार रुपयांत तुम्ही कोरफडीच्या शेतीचा (Aloe Vera Farming) व्यवसाय करू शकता आणि चांगला नफा कमवू शकता.

कोरफडीचा उपयोग आयुर्वेदिक औषधं, ब्युटी प्रॉडक्ट आणि खाद्यपदार्थांमध्येही केला जातो. कोरफड खूप गुणकारी आहे हे आता सर्वांना माहीतच आहे. लघुउद्योगांपासून ते आंतरराष्ट्रीय कंपन्याही कोरफडीची उत्पादनं विकत आहेत. त्यामुळे सध्या कोरफडीची शेती हा खूपच नफा कमवून देणारा व्यवसाय ठरत आहे. तुम्हीही ही शेती करून पैसे कमवू शकता. कॉस्मेटिक, मेडिकल आणि फार्मास्युटिकल क्षेत्रात कोरफडीला प्रचंड मागणी आहे. कोरफडीचा रस, लोशन, क्रीम, जेल, शँपुची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आयुर्वेदिक आणि युनानी उपचार पद्धतींमध्ये अनेक वर्षांपासून कोरफडीचा वापर केला जात आहे.

तुम्ही सरळ कोरफडीची शेती करू शकता किंवा ते शक्य नसेल तर कोरफडीचा रस काढणारं, पूड तयार करणारं यंत्र विकत घेऊन तो व्यवसाय करू शकता. आम्ही तुम्हाला कोरफडीवर प्रक्रिया करण्यासाठीच्या प्लांटसाठी येणाऱ्या खर्चाची माहिती देणार आहोत. यात विक्रीचं मार्जिनही भरपूर आहे. कोरफडीची शेती करण्यासाठी तुम्हाला ५० हजार रुपयांहून कमी पैसे लागतात. तुमच्या शेतातली कोरफड तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना विकू शकता किंवा तुमचं स्वत:च फूड प्रोसेसिंग युनिट सुरू करू शकता. या प्लाँटमध्ये कोरफड जेल, ज्युस तयार करता येतो तो विकून तुम्ही चांगला फायदा मिळवू शकता पण तुम्हाला प्रोसेसिंग युनिट सुरू करायला ३ ते ५ लाख रुपये खर्च येईल.

प्लांटसाठी कच्चा माल, कामगार, पॅकेजिंग याचा खर्च करावा लागेल. भारतात अनेक ठिकाणी एकदा कोरफडीची लागवड करून ३ वर्षांपर्यंत पीक मिळत राहतं काही ठिकाणी तर ५ वर्षांपर्यंत पीक मिळत राहतं. कोरफडीच्या शेतीच्या व्यवसायात तुम्हाला ५० ते ६० हजार रुपयांची गुंतवणूक करून ५ ते ५ लाख रुपये नफा कमवता येऊ शकतो. कमी खर्चात तुम्ही हँडवॉश, सोपचाही व्यवसाय सुरू करू शकता.