Amazon Mega Home Summer Sale : अमेझॉनचा 4 दिवसांचा सेल सुरू, मिळत आहे शानदार डिस्काऊंट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनवर मेगा होम समर सेल सुरू झाला आहे. सेलची सुरूवात आज 4 मार्चपासून झाली आहे, जो 7 मार्चपर्यंत चालेल. या सेल दरम्यान ग्राहकांना होम एप्लायन्सेस, टीव्ही, फर्नीचर, टॉईज आणि इतर समर प्रॉडक्टवर आकर्षक ऑफर मिळेल.

एचडीएफसीच्यावर 10 टक्केचा इन्स्टंट डिस्काऊंट
मेगा होम समर सेलमध्ये ग्राहकांना एलजी, सॅमसंग, व्हर्लपूल, व्होल्टाज, सिम्फनी आणि इतर ब्रँड्सवर ऑफर मिळवू शकता. 7500 रुपयांच्या मिनिमम शॉपिंगवर एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड, कार्ड ईएमआय आणि डेबिट कार्ड ईएमआयद्वारे पेमेंट केल्यास इन्स्टंट10 टक्के डिस्काऊंट सुद्धा मिळेल. मात्र, या ऑफर अंतर्गत तुम्ही मॅक्सिमम 1500 रुपयांचा डिस्काऊंट मिळवू शकता. तर, मेगा होम समर सेलमध्ये अफोर्डेबल नो-कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर्स, शेड्यूल डिलीव्हरी आणि इन्स्टॉलेशन सुद्धा ऑफर केले जात आहे.

17,490 रुपयात एसी खरेदी करण्याची संधी
या सेलमध्ये 22,999 रुपयांच्या प्रारंभीच्या किंमतीवर स्प्लिट इन्व्हर्टर एसी मिळत आहे. विंडो एसी 17,490 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर खरेदी करू शकता. तर, अमेझॉन बेसिक्सचे स्प्लिट एसी 22,499 रुपयांच्या प्रारंभी किंमतीवर उपलब्ध होतील.

657 रुपये प्रारंभी ईएमआयवर फ्रिज खरेदी करण्याची संधी
अमेझॉनच्या सेलमध्ये एलजी, सॅमसंग, व्हर्लपूल, हायर, गोदरेज सारख्या टॉप ब्रँड्सच्या रेफ्रिजरेटर्सवर 35 टक्केपर्यंतची सूट मिळत आहे. सेलच्या दरम्यान अवघ्या 657 रुपयांच्या प्रारंभीच्या ईएमआयवर फ्रिज खरेदी करू शकता. यामध्ये एनर्जी एफिशियंट रेफ्रिजरेटर्स 13,790 रुपयांच्या प्रारंभीच्या किंमतीवर आणि कन्व्हर्टेबल रेफ्रिजरेटर्स 21,290 रुपयांच्या प्रारंभीच्या किंमतीवर खरेदी करू शकता.