जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीनं गर्लफ्रेन्डला दिलं 1200 कोटींचं अलिशान घर

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन – जगातील सर्वात श्रीमंत आणि अ‍ॅमेझॉन (Amazon) चे संस्थापक-सीईओ जेफ बेझोस (Jeff Bezos) ने अमेरिकेच्या लॉस अँजेलिस मध्ये १६.५ कोटी डॉलर (जवळपास १२०० कोटींपेक्षा अधिक) चे आलिशान घर खरेदी केले आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, जेफ बेझोस ची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेज नवीन घर घेण्याच्या तयारीत होती. तिने जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात हे घर पसंत केले होते.

एका अहवालात म्हटले आहे की हा लॉस अँजेलिस मधील संपत्तीच्या बाबतीत आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार आहे. याअगोदर २०१९ मध्ये लाशन मर्डोक ने बेल एअर इस्टेट ला खरेदी करण्यासाठी जवळपास १५ कोटी डॉलर मोजले होते. अमेरिकेची मोठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon) चे सीईओ जेफ बेझोस यांची संपत्ती १३ फेब्रुवारी रोजी १३१.३ अब्ज डॉलर्स इतकी असल्याचे समोर आले. सध्या तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.

काय खास आहे
हे घर जवळपास नऊ एकरा मध्ये पसरलेले आहे. एका अहवालात म्हटले आहे की आर्किटेक्चरल डायजेस्टच्या १९९२ च्या एका कथेत वॉर्नर इस्टेटचा उल्लेख आहे. त्यानुसार, ही हवेली १३,६०० चौरस फूट जॉर्जियन स्टाईलमध्ये तयार केली गेली आहे.

यामध्ये एक विस्तीर्ण टेरेस आणि गार्डन आहे. याशिवाय वॉर्नर इस्टेटमध्ये दोन गेस्ट हाऊस, नर्सरी आणि तीन हॅथहाउस, टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल, ९ होल गोल्फ कोर्स, मोटर कोर्ट, सर्व्हिस गॅरेज आणि गॅस पंप आहेत.

मीडिया रिपोर्ट्स नुसार, हे लॉस अँजेलिस मधील प्रॉपर्टीच्या बाबतचे नवीन रेकॉर्ड आहे. या आलिशान घराचे नाव ‘वॉर्नर इस्टेट’ आहे. हे वॉर्नर ब्रदर्सचे माजी अध्यक्ष जॅक वॉर्नर यांनी १९३० मध्ये बांधले होते.