Ambadas Danve | उद्धव ठाकरेंना घाबरुन ते तिघे एकत्र येतील, पण…,  ठाकरे-शिंदे-फडणवीसांच्या भेटीवर अंबादास दानवेंचा टोला

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेतर्फे आयोजित शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) दीपोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावल्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिंदे-फडणवीस युतीच्या (Shinde-Fadnavis alliance) चर्चांना उधान आले आहे. त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) घाबरुन ते तिघे एकत्र येतील, असा टोला अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी लगावला. मात्र, कितीही येऊ दे आम्ही मुकाबला करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना सरकारवर टीका केली. तसेच यावेळी त्यांनी राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर देखील भाष्य करत त्यांना टोला लावला. हे तिघेही एकवेळ उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) घाबरुन एकत्र येतील, असा टोला अंबादास दानवेंनी लावला. मात्र, कितीही येऊदे आम्ही मुकाबला करु, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दर्शविला.

दानवे पुढे म्हणाले, भोंग्याचे काय झाले? टोलचे काय झाले? असे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत.
राज ठाकरे, फडणवीस आणि एकनाथ शिंदे या तिनही लोकांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्या विषयी दहशत आहे.
त्यामुळेच ते महापालिका निवडणुकीत (BMC election) एकत्र येऊ शकतात.
या तिघांना लोक मोठे नेते का म्हणतात? हेच मला कळत नाही.
एकजण चाळीस आमदार घेऊन बाहेर पडला, यात कसला आला मोठेपणा? याला गद्दारी म्हणतात.
एकाचा तर एकही आमदार या महाराष्ट्रात नाही. आणि फडणवीसांचे म्हणाल,
तर ते मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झालेले. मग यांना मोठे का म्हणायचे? असे म्हणत दानवेंना तिघांची देखील फिरकी घेतली.

शिंदे यांचे सरकार आल्यापासून फडणवीस आणि शिंदे यांचे राज ठाकरे यांच्यासोबत संबंध वाढले आहेत.
जनतेला उत्सुकता आहे की, आगामी निवडणुकांत ते एकत्र येणार आहेत का?
पण अद्याप त्यांच्यापैकी कोणीही खुलासा केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या भेटींकडे जनता आणि राजकीय पक्ष संशयमिश्रीत कुतूहलाने बघत आहेत.

Web Title :-  Ambadas Danve | ambadas danve taunt eknath shinde fadnavis and raj thackeray during alliance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kishori Pednekar | घर फिरले की घराचे वासे फिरतात, पण शिवसेनेत मात्र वासे पहिले फिरले आणि आता…, किशोरी पेडणेकरांची ठाकरे-शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र

Pune Crime | समर्थ आणि अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर गुन्हे शाखेचे छापे, 18 जणांवर कारवाई