ज्युनियर अंबानींच ‘पृथ्वी’ असं नामकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश आणि त्याची पत्नी श्लोका यांनी पुत्रप्राप्तीचा गॉड बातमी दिली होती. अंबानी कुटुंबात १० डिसेंबरला चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं असून या नवजात बाळाचा नामकरण सोहळा पार पडला. कुटुंबातील या नव्या पाहुण्याचं नाव अंबानींनी जाहीर केलं असून आकाश आणि श्लोकाने त्यांच्या मुलाचं नाव पृथ्वी असं ठेवलं आहे. दरम्यान, अंबानी कुटुंबात आकाश हे नाव आधीच असल्याने या चिमुकल्याचं नाव पृथ्वी ठेवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. या नव्या पाहुण्याचं पूर्ण नाव पृथ्वी आकाश अंबानी असं असणार आहे.

आकाश अंबानी आणि श्लोका २०१९ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. आकाश आणि श्लोका दोघेही शाळेपासूनच एकमेकांना ओळखत आहेत. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्येच दोघांनीही आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. आकाश आणि श्लोका यांच्या लग्न अत्यंत थाटामाटात पार पडलं होतं. त्यानंतर आकाश आणि श्लोका यानं पुत्रप्राप्ती झाल्याने मुकेश आणि नीता अंबानी प्रथमच आजी-आजोबा झाल्यामुळे अतिशय खुश आहेत. धीरूभाई आणि कोकिलाबेन अंबानी यांच्या पणतूचं ते आनंदाने स्वागत करत आहेत. बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत. नव्या पाहुण्याच्या आगमनाने अंबानी आणि मेहता कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे,” अशी माहिती अंबानी कुटुंबाच्या प्रवक्त्याने दिली होती.