जय भीम ! 14 एप्रिलला सार्वजनिक सुट्टी जाहीर, डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त केंद्राकडून मानवंदना

पोलीसनामा ऑनलाईन टीम : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची येत्या 14 एप्रिलला 130 वी जयंती आहे. यानिमित्त महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये या दिवशी सुट्टी असते. परंतू आता केंद्र सरकारने या जयंतीचे औचित्य साधून देशभरामध्ये हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला आहे. कामगार, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने याचे नोटिफिकेशन जारी केले आहे.

यामुळे यंदापासून या दिवशी सरकारी कार्यालयांसह औद्योगिक आस्थापनांमध्ये सार्वजनिक सुटी दिली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने 14 एप्रिल 2021 रोजी सार्वजनिक सुटी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात देशातील औद्योगिक आस्थापनांसह सर्व केंद्र शासकीय कार्यालयांमध्ये या दिशी सुट्टी दिली जाणार आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला होता.