‘नासा’नं दाखवले ब्रह्मांडीय दुनियेतील आश्चर्यजनक, अभूतपूर्व आणि दुर्मिळ फोटो !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकन एजन्सी ‘नासा’ने ब्रह्मांडीय दुनियेतील आश्चर्यजनक, अभूतपूर्व आणि दुर्मिळ फोटो दाखवले आहेत. त्यामध्ये अनेक आकाशगंगा, सुपरनोवाचे अवशेष, तारे प्लानेटरी नेबुलाज यांचा सहभाग आहे. हे फोटो जगातील सर्वात शक्तिशाली एक्स-रे दुर्बीण ‘चंद्रा एक्स-रे ऑब्जर्वेटरी’ द्वारे काढण्यात आले आहेत.

1999 मध्ये निर्माण करण्यात आली होती वेधशाळा

23 जुलै 1999 मध्ये नासाने ही वेधशाळा निर्माण केली होती. या वेधशाळेचे नामकरण भारतीय अमेरिकी भौतिक वैज्ञानिक सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांच्या सन्मानार्थ करण्यात आले होते.

कधी बनतात एक्स-रे

ही वेधशाळा वैज्ञानिकांना अवकाशातील विविध उच्च ऊर्जा असणाऱ्या क्षेत्रातील एक्स-रे इमेज काढण्यासाठी मदत करते. कॉस्मिक वर्ल्ड मध्ये हे फोटो तेव्हाच निघतात जेव्हा एखादा पदार्थ लाखो डिग्री पर्यंत गरम होतो. याचं उत्सर्जन ब्लॅक होल्स, न्यूट्रॉन स्टार आणि सुपरनोवाच्या अवशेषांद्वारे होते.

चंद्रा कडून घेण्यात आला डाटा

नासाने दाखवलेल्या प्रत्येक फोटो मध्ये चंद्रा सोबत अन्य दुर्बिणीने घेतलेल्या फोटोंचा देखील समावेश आहे. नासाने मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर अवकाशातील हे सुंदर फोटो शेअर करत लिहिलं, ‘विविध आकाशगंगांच्या मध्ये आपल्या अवकाशाचे दृश्य.’