Bloomberg Index of 2021 : US पहिल्या 10 देशांच्या सूचीतून बाहेर, ‘चीन’ही घसरून 16 व्या स्थानावर, भारत चांगल्या स्थितीत

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना साथीच्या दरम्यान ब्लूमबर्गने आपला नवीन इनोव्हेशन इंडेक्स 2021 जारी केला आहे. या अहवालात भारताची स्थिती पूर्वीपेक्षा सुधारली आहे. या यादीमध्ये जगातील इनोव्हेशन म्हणजेच नवनिर्मितीच्या बाबतीत भारताचा क्रमांक 50 वा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारत चार स्थानांनी वरती आला आहे. या इंडेक्समध्ये दक्षिण कोरिया अव्वल स्थानावर आहे. विशेष बाब म्हणजे अमेरिका अव्वल 10 देशांच्या यादीतून बाहेर आहे आणि चीन एका स्थानाने घसरून 16 व्या स्थानावर आहे. जगात कोरोना साथीचा आजार पसरल्यानंतर ब्लूमबर्गने प्रथमच आपला अहवाल जाहीर केला. या अहवालात कोरोना साथीचा परिणामही स्पष्ट दिसून येत आहे.

इंडेक्‍समध्ये प्रमुख देशांचे स्थान

2021 मध्ये दक्षिण कोरिया ब्लूमबर्ग इनोव्हेशन इंडेक्समध्ये अव्वल स्थानावर आला आहे. यावेळी दक्षिण कोरियाने जर्मनीला नमवून प्रथम स्थान गाठले आहे. यावर्षी जर्मनी चौथ्या क्रमांकावर आहे. सिंगापूर दुसर्‍या आणि स्वित्झर्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्वीडन 5 व्या स्थानी असून डेन्मार्क 6 व्या आणि इस्रायल 7 व्या स्थानावर आहे. फिनलँड 9 व्या आणि ऑस्ट्रिया 10 व्या स्थानावर आहे. अमेरिका पहिल्या दहा स्थानातून घसरत 11 व्या स्थानावर पोहोचला आहे. या निर्देशांकात 12 ते 20 व्या क्रमांकावर अनुक्रमे जपान, फ्रान्स, बेल्जियम, नॉर्वे, चीन, आयर्लंड, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि इटली यांनी जागा घेतली आहे.

टॉप -10 देशांच्या यादीत 7 युरोपियन देश

या इंडेक्‍समध्ये जर्मनी चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी तो अव्वल स्थानावर होता. अमेरिकेचे व्यापार युद्ध आणि कोरोना साथीच्या आजारामुळे चीन एका स्थानाने खाली आला आहे. पूर्वी तो 15 व्या स्थानावर होता, यावेळी तो 16 व्या स्थानावर आहे. याअंतर्गत 200 पेक्षा जास्त देशांच्या अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या मापदंडांवर डेटा घेतला जातो. इंडेक्‍समध्ये शीर्ष देशांची यादी प्रसिद्ध केली जाते. इंडेक्‍स असे दर्शवितो की दक्षिण कोरिया, जर्मनी आणि इस्रायलसारख्या अव्वल देशांनी कोरोनाशी लढण्यातही चांगले काम केले आहे.

ब्लूमबर्ग एक खासगी कंपनी

ब्लूमबर्ग एलपी एक खासगीरित्या आयोजित आर्थिक, सॉफ्टवेअर डेटा आणि मीडिया कंपनी आहे. याचे मुख्यालय मिडटाऊन मॅनहॅटन न्यूयॉर्क शहरात आहे. इनोव्हेशन नेहमी नवीन कल्पना, नवीन सेवांद्वारे मोजले जाते. ब्लूमबर्ग इंडेक्स दहापेक्षा जास्त मुद्द्यांच्या आधारे देशांची तपासणी करते. यामध्ये देशांचा संशोधन आणि विकास खर्च, उत्पादन क्षमता, उच्च तंत्रज्ञानाच्या सार्वजनिक कंपन्या आणि सात इक्विलिटी व्हेटेज मोजले जातात.