Amit Shah | अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा रद्द, दिल्लीकडे निघालेल्या शेतकरी आंदोलनाचा परिणाम?

छत्रपती संभाजीनगर : Amit Shah | केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह १५ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे सभेसाठी येणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. हा दौरा रद्द का झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा विविध मागण्यांसाठी मोदी सरकारविरोधात आंदोलन छेडले असून दिल्लीकडे कूच केले आहे, यामुळेच हा दौरा रद्द झाल्याचे बोलले जात आहे. (Amit Shah)

छत्रपती संभाजीनगर येथील सभेची आज दुपारपर्यंत जय्यत तयारी सुरू होती. आज दुपारी भाजपा पदाधिकाऱ्यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ सभास्थळाच्या तयारीची पाहणी देखील केली. मात्र, त्याचवेळी अमित शाह यांचा दौरा रद्द झाल्याचा मेसेज वरिष्ठ नेत्यांना आला.

यापूर्वी सप्टेंबर २०२३ मध्ये देखील अमित शाह यांची नियोजित सभा रद्द झाली होती.
तेव्हा सुद्धा सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर अचानक दौरा रद्द झाला होता.
आता पुन्हा एकदा स्थानिक भाजपा नेते, पदाधिकारी यांनी केलेली मेहनत वाया गेली आहे.

दरम्यान, आपल्या विविध मागण्यासाठी शेतकरी संघटनांनी पुन्हा दिल्लीकडे कूच केले आहे.
शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी जवानांची मोठी फौज तैनात केली आहे. तर, दुसरीकडे शेतकरी देखील आक्रमक भूमिकेत आहेत. गोळ्या झाडा किंवा लाठीचार्ज करा, आमचे शांततेत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा शेतकरी संघटनांनी घेतला आहे. याच कारणामुळे गृहमंत्री शाह यांचा महाराष्ट्र दौरा रद्द झाला असल्याचे बोलले जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

API And Two Lady Cops Suspended In Pune | पुणे: सहाय्यक पोलिस निरीक्षकासह (API) दामिनी पथकातील 2 महिला पोलिस तडकाफडकी निलंबीत

Shiv Sena MP Sanjay Raut | अशा पद्धतीने ते २०० पार सुद्धा जाणार नाहीत, संजय राऊत यांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

Ashok Chavan | भाजपा प्रवेशानंतर आदर्श घोटाळ्याबाबत अशोक चव्हाण म्हणाले, ”हा चिंतेचा विषय…”

Pune Datta Nagar Crime | ‘तुला पण तुझ्या बापासोबत संपवून टाकतो’ ! पितापुत्राच्या पोटात चाकूने सपासप वार करुन जीव ठार मारण्याचा प्रयत्न

Fire At Pune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनवरील डब्याला मध्यरात्री आग; यार्डातील डबा जळून खाक, जीवित हानी नाही (Video)

TET Exam Scam | टीईटी घोटाळ्यातील आरोपींचे एक कोटींचे दागिने न्यायालयाने केले परत