Amitabh Bachchan | बच्चन कुटुंबातील ‘या’ खास सदस्याचे निधन; अमिताभ बच्चन यांनी पोस्ट शेअर करत दिली माहिती…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मागच्याच शुक्रवारी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा सुरज बरजात्या (Sooraj Barjatya) दिग्दर्शित ‘ऊंचाई’ (Unchai) चित्रपट प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन यांचे या वर्षांमध्ये पाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाले आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोबत बोमन इराणी (Boman Irani), अनुपम खेर (Anupam Kher) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तर सध्या या चित्रपटाला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत असल्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन वरून लक्षात येते.

 

यंदाचा 80 वा वाढदिवस अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी केबीसीच्या (KBC) मंचावर साजरा केला होता. या वयामध्ये देखील ते अ‍ॅक्टिव्ह राहून काम करत असल्याने सर्वांनाच प्रेरणा मिळत आहे. एवढेच नाही तर ते सध्या डिजिटल माध्यमातून देखील सक्रिय दिसतात. दर दोन ते तीन दिवसांनी फोटो किंवा व्हिडिओ शेअर करून ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. तर नुकताच त्यांनी एक फोटो इंस्टाग्राम वर शेअर केला आहे जो सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याचे सांगितले आहे.

 

या पोस्टच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लाडक्या कुत्र्याचे (Dog) मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. त्या कुत्र्यासोबत चा फोटो शेअर करत त्यांनी भावनिक असा कॅप्शन देखील दिला आहे. यावर त्यांनी म्हटले की, “आपले छोटे दोस्त…. कामाचे क्षण….. मग हे मोठे होतात आणि एके दिवशी आपल्याला सोडून जातात”. त्यांच्या या भावनिक पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तर त्यांच्या या पोस्ट खाली अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. यावरून अमिताभ बच्चन हे श्वानप्रेमी असल्याचे मात्र नक्की लक्षात येते.

अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ते सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati)
या कार्यक्रमाचे चित्री करण्यामध्ये व्यस्त आहेत तर ‘गणपत’ (Ganpat) या टायगर श्रॉफ (Tiger Shroff)
च्या चित्रपटामध्ये देखील ते झळकणार आहेत. तर ‘बाहुबली’ (Bahubali) फेम प्रभास (Prabhas)
सह ते एका प्रोजेक्टवर काम करताना देखील दिसणार आहेत.
या दोन चित्रपटा व्यतिरिक्त त्यांचे आणखीन दोन चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

 

Web Title :- Amitabh Bachchan | amitabh bachchan became emotional after the death of close person

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prakash Ambedkar | मुख्यमंत्री भेटून गेल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी साधला माध्यामांशी संवाद, म्हणाले…

Eknath Khadse | साधना महाजन तुमच्या कुटुंबातीलच आहेत ना? – एकनाथ खडसे

Urfi Javed | आंतरराष्ट्रीय ग्लॅमर वर्ल्डमध्ये चालली उर्फी जावेदची जादू, होतेय टेलर स्विफ्टच्या फॅशनची चर्चा