Amitabh Bachchan Instagram Post – अमिताभ बच्चनने इंन्टाग्रामवर शेअर केली नातू अगस्त्यसाठी एक खास पोस्ट…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध महानायक अमिताभ बच्चनने आपल्या अभिनयाने अवघ्या देशाला वेड लावलं (Amitabh Bachchan Instagram Post). त्यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून, अनेक चाहते त्यांच्या एका झलकसाठी वेडावलेले दिसतात. तर अलीकडेच बिग बी यांचा नातू मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याच्या गोष्टींना उधान आलं आहे (Amitabh Bachchan Instagram Post).

बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदा लवकरच बॉलीवूडमध्ये येणार आहे. लवकरच अगस्त्यचा चित्रपट ‘द आर्चीज (The Archies) ’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधून तो अभिनयाच्या दुनियेत आपल्या करियरची सुरूवात करणार आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावरील ही पोस्ट अमिताभ बच्चनने
त्याचा इंन्टाग्रामच्या अकाउंवर शेअर केली आहे (Amitabh Bachchan Instagram Post). त्यांनी ‘द आर्जीच’
या चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये त्यांनी “ माझ्या प्रिय अगस्त्य तुला आशीर्वाद आणि खूप शुभेच्छा ”
असं लिहून त्याच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, ‘द आर्चीज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जोया अख्तरने (Zoya Akhtar) केलं असून, हा चित्रपट एका कॉमिक
बुकवर आधारित आहे. या चित्रपटामधून अनेक स्टारकिड प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुहाना खान (Suhana Khan),
खुशी कपूर (Khushi Kapoor) आणि अगस्त्य नंदा (Agastya Nanda) ‘द आर्चीज’ मधून चित्रपटसृष्टीमध्ये
(Bollywood Upcoming Movie) पदार्पण करणार आहे. तसेच हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Imbalance Mental Health | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!

Low Blood Pressure | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!

Ananya Panday Diwali Look | अनन्या पांडेने दिवाळी लूक शेअर करून नेटकऱ्यांच वेधलं लक्ष, व्हायरल फोटो पाहून चाहत्यांची हटेना नजर..