Amitabh Bachchan | ‘झुमका गिरा रे’ या गाण्यांचा रिमेक असणाऱ्या ‘व्हाट झुमका’ गाण्यांशी अमिताभ बच्चन यांचा आहे निकटचा संबंध

पोलीसनामा ऑनलाइन – Amitabh Bachchan | सध्या सर्वत्र अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) व अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) याची सर्वत्र चर्चा आहे. या आठवड्यात येत्या 28 तारखेला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान चित्रपटाच्या गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. चित्रपटातील ‘तुम क्या मिलें’ व ‘व्हाट झुमका हे’ गाणे (What Jhumka Song) सध्या ट्रेंडिंगवर आहे. ‘व्हाट झुमका’ हे गाणे ‘मेरा साया’ (Mera Saya) चित्रपटातील मधील ‘झुमका गिरा रे’ (Jhumka Gira Re) या सुपरहिट गाण्याचा रिमेक आहे. ‘झुमका गिरा रे’ हे अजरामर गाणे आशा भोसले (Asha Bhosle) यांनी गायले होते व गाण्याचे बोल राजा मेहदी साहेब (Raja Mehdi Saheb) यांनी लिहिले आहेत. मात्र या गाण्याशी अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा संबंध आहे. अनेकांना ही गोष्ट अद्याप माहिती झालेली नाही.

‘झुमका गिरा रे बरेली की बाजार में’ या सुप्रसिद्ध गाण्यांचे बोल लिहिणारे राजा मेहदी साहेब यांच्या या गाण्यामध्ये एक लव स्टोरी लपलेली आहे. राजा मेहदी साहेब हे प्रसिद्ध लेखक हरिवंश राय बच्चन (Harivansh Rai Bachchan) व तेजी सुरी (Teji Suri) या दोघांचे चांगले मित्र होते. हरिवंश बच्चन यांच्या लेखनाची किर्ती सर्वदूर पसरली होती. एकदा ते प्रोफेसर ज्योति यांच्या घरी पार्टीसाठी आले होते. यावेळी तिथे तेजी सुरी देखील उपस्थित होत्या. दोघांची नजरानजर झाली आणि पहिल्यांच नजरेत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र सुरी यांचा साखरपुडा एका बिजनेसमॅन सोबत झाला होता. तरी त्या हरिवंश बच्चन (Harivansh Bachchan Love Story With Teji Suri) यांच्या प्रेमात पडल्या.

पार्टीमध्ये हरिवंश यांचे गाणे तेजी सुरी यांच्या हृद्याला इतके भिडले की त्या रडू लागल्या.
त्यांची ही प्रेमव्यथा उपस्थित सर्वांच्या लक्षात आली.
पार्टीनंतर तेजी या लाहौरला निघून गेल्या तर हरिवंश देखील अलहाबादला निघून आले. या दोघांमधील कॉमन फ्रेंड असलेले राजा मेहदी साहेब यांना देखील दोघांच्या प्रेमाची चाहुल लागली होती. राजा साहेब यांनी तेजी सूरी यांना विचारले की हरिवंश व तुम्ही लग्न कधी करणार आहात ? यावर तेजी सुरी यांनी दिलेले उत्तर अजरामर ठरले. तेजी म्हणाल्या की, “अरे राजा, मेरा झुमका तों बरेली की बाजार मैं ही गिर गया था” लेखक राजा मेहदी साहेब यांना हे उत्तर इतके भावले की ते त्यांच्या बरोबर लक्षात राहिले. नंतर लेखक हरिवंश राय बच्चन व तेजी सुरी यांनी विवाह देखील केला. लेखक राजा मेहदी साहेब यांनी ‘मेरा साया’ चित्रपटामध्ये जेव्हा बरेलीच्या बाजारावर गाणे तयार करायची संधी मिळाली तेव्हा त्यांनी ‘झुमका गिरा रे बरेली के बाजार मैं’ (Jhumka gira re Bareilly ke bazaar main) हे अजरामर गाणे तयार केले.

राजा मेहदी साहेब यांच्या गाण्यामध्ये हरिवंश बच्चन व तेजी सुरी यांची प्रेमकथा शब्दबद्ध झाली.
पुढे हरिवंश व तेजी यांना मुले झाली. त्यापैकीच एक म्हणजे बॉलीवुडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन
(Amitabh Bachchan). अमिताभ बच्चन यांचे आई वडिल असलेले हरिवंश बच्चन व तेजी सुरी यांची लवस्टोरी
अशा पद्धतीने ‘झुमका गिरा रे’ गाण्याशी निगडित आहे. सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या करण जोहर
(Karan Johar) दिग्दर्शित चित्रपटामध्ये या गाण्याचा रिमेक करण्यात आला असून हे नवीन गाणे ‘व्हॉट झुमका’ हे
गाणे देखील हिट ठरत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Water News | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता संपली, खडकवासला धरण 82 टक्के भरले