Pune Water News | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता संपली, खडकवासला धरण 82 टक्के भरले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water News | पुणेकरांसाठी एक आनंदाची माहिती समोर आली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा (Pune Water News) करणाऱ्या खडकवासला (Khadakwasla), पानशेत (Panshet), टेमघर (Temghar) आणि वरसगाव (Varasgaon Dams) या धरण प्रकल्पात आता पिण्यासाठी वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा (Water Reservoir) जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता आतापुरती मिटली आहे. धरणांमध्ये सोमवारी सायंकाळपर्यंत 17.21 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे.

मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 3.27 टीएमसी पाणीसाठा (Pune Water News) कमी आहे. मागील काही दिवसांपासून खडकवासला साखळी प्रकल्पातील धरणात संततधार पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ होताना दिसत आहे. घाटमाथ्यासह धरण क्षेत्रातील पावसाच्या हजेरीमुळे धरणातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होत आहे. त्यामुळे आज खडकवासला साखळी प्रकल्पात 59.03 टक्के म्हणजेच 17.21 टीएमसी (TMC) एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षी याच दिवशी धरण प्रकल्पात 20.48 टीएमसी (70.28 टक्के) पाणीसाठा होता. त्या तुलनेत सध्या 3.27 टीएमसी पाणीसाठा कमी आहे.

खडकवासला धरण 82 टक्के भरले आहे. मात्र, धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
त्यामुळे येत्या 24 ते 48 तासांत खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात (Mutha River Basin) पाणी सोडले जाण्याची दाट शक्यता आहे.
यामुळे नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये तसेच नदीपात्रात तत्सम साहित्य किंवा प्राणी आढळल्यास ते तातडीने हलवावेत,
असे आवाहन पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

25 July Rashifal : वृषभ, मिथुन आणि धनुसह या तीन राशीवाल्यांसाठी आजचा दिवस खास, वाचा दैनिक राशिफळ

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर