‘बिग बी’ अमिताभनं शेअर केला 1979 मधील खास फोटो ! यातील मुलगा आज बॉलिवूडमधील ‘सुपरस्टार’

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या फेमस शो कौन बनेगा करोडपतीचं (Kaun Banega Crorepati) सूत्रसंचालन करत आहे. अमिताभ बच्चन सोशलवर कायमच अ‍ॅक्टीव्ह असतात. अनेकदा त्यांनी शेअर केलेली पोस्ट सोशलवर चर्चेत आल्याचं दिसतं. अमिताभनं नुकताच एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळं ते चर्चेत आले आहेत. हा फोटो 1979 मधील आहे.

अमिताभ यांनी इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. ह फोटो 1979 मध्ये आलेल्या त्यांच्या मिस्टर नटवरलाल या सिनेमा दरम्यानचा आहे. तेव्हा बिग बी पहिल्यांदाच या सिनेमातील एक गाणं गाणार होते.

फोटो शेअर करताना त्यांनी खास कॅप्शनही दिलं आहे. ते लिहितात, पहिलं गाणं मी गायलं होत ते म्हणजे मिस्टर नटवरलाल सिनेमासाठी, मेरे पास आओ. म्युझिक डायरेक्टर राजेश रोशन सोबत म्युझिकच रिहर्सल आणि हे सगळं चाललं होतं ते म्हणजे या समोर बसलेल्या मुलासाठी आणि हा मुलगा हृतिक रोशन आहे.

बिग बींचा हा फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना तर हृतिक ओळखूही येत नाहीये.

हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा वॉर या सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत होता. आता लवकरच तो फायटर सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्या सोबत दीपिका पादुकोण काम करणार आहे. हा एक बिग बजेट सिनेमा असल्याचं बोललं जात आहे.