मनोरंजन

अमिताभ बच्चन यांच्यावर होतेय सर्जरी, ब्लॉगमध्ये स्वत: दिली माहिती; चाहत्यांकडून प्रार्थना

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खुप सक्रिय असतात. येथे ते नेहमी आपल्या फॅन्सशी संवाद साधत असतात. अनेक वेळा आपल्या जीवनातील किस्से सुद्धा ते शेयर करतात. मात्र, यावेळी त्यांच्या नवीन ब्लॉगने सर्वांना धक्का दिला आहे. ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितले आहे की, मेडिकल कंडीशनमुळे त्यांची एक सर्जरी होणार आहे.

अमिताभ बच्चन यांची होणार सर्जरी
अमिताभ यांनी शनिवार रात्री 10.16 मिनिटांनी (27 फेब्रुवारी) एक पोस्ट लिहिली. पोस्टद्वारे त्यांनी आपल्या तमाम फॅन्सला हेल्थ अपडेट दिले. त्यांनी लिहिले – मेडिकल कंडीशन…सर्जरी…जास्त काही लिहू शकत नाही.

अमिताभ यांच्या इतकेच लिहिण्याने फॅन्सची चिंता वाढली आहे. सर्वांना ही चिंता आहे की, अखेर अमिताभ बच्चन यांना अचानक काय झाले? अशी कोणती मेडिकल कंडीशन आली आहे ज्यामुळे त्यांना सर्जरी करावी लागत आहे? सोशल मीडियावर अनेक प्रकारचे अंदाज वर्तवले जात आहेत. परंतु, अद्याप याबाबत जास्त माहिती समोर आलेली नाही.

 

 

अमिताभ यांच्या या फोटोने वाढली अस्वस्था
आपल्या ब्लॉगशिवाय अमिताभ बच्चन यांनी दहा तासांपूर्वी इंस्टाग्रामवर सुद्धा आपला एक फोटो शेयर केला होता. तो फोटो शेयर करत त्यांनी केवळ अनेक प्रश्नचिन्ह टाइप केली होती. अशाप्रकारे त्यांचे लिहिणे देखील फॅन्सची चिंता वाढवणारे आहे. अजूनपर्यंत काहीही स्पष्ट झालेले नाही आणि प्रत्येकजण त्यांनी लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना करत आहे.

Back to top button