Amol Gajanan Kirtikar | वडील शिंदेंकडे तर मुलगा उद्धव ठाकरेंकडे; उद्धव ठाकरे गटातून गजानन कीर्तिकर यांची हकालपट्टी

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन – Amol Gajanan Kirtikar | CM एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेले. त्यात, गेल्या काही दिवसांपासून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) हे शिंदे गटात सामील होण्याची चर्चा रंगली होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आणि कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता शिंदे गटातील खासदारांची संख्या आता १३ वर पोहोचली आहे. एकनाथ शिंदे गटातील ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भेट घेत त्यांचे या गटात स्वागत केले. यानंतर उद्धव ठाकरे गटातून गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांची हकालपट्टी करण्यात आली. (Amol Gajanan Kirtikar)

पण गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर (Amol Gajanan Kirtikar) मात्र अजूनही उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) गटात आहेत. अमोल किर्तीकर शिवसेनेच्या उपनेतेपदावर नियुक्त आहेत. त्यामुळे वडिलांनी वेगळा निर्णय घेतलेला असतानाही अमोल किर्तीकर अजूनही उद्धव ठाकरे गटात आहेत. यासंदर्भात गजानन किर्तीकर यांना विचारणा केली असता त्यांनी यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली.

“तो शिवसेनेत काम करायला लागला ते स्वत:च्या मर्जीनं. मी, माझ्या मुलाला कसलेही बंधन घातलेले नाही.
त्याला मी काही करायला सांगितले नाही. त्याच्यात आणि माझ्यात कोणताही वाद नाही.
मी त्याला म्हटलं मला जायचंय. हे काही मला सहन होत नाहीये. ही शिवसेना वेगळ्या पद्धतीने चाललीये.
शिवसेनेत हा बदल झाला. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीची (NCP) सोबत घेतली. हिंदुत्ववाद (Hindutva) सोडला.
जर त्यांनी भाजपाची सोबत पुन्हा केली तर मला त्या शिवसेनेसोबत राहायचंय.
नसेल, तर मला जायचंय”, असे स्पष्टीकरण देत त्यांच्या मुलावर कोणतेही निर्णय लादणार नसल्याची भूमिका गजानन किर्तीकरांनी घेतली.

Web Title :-  Amol Gajanan Kirtikar | Gajanan Kirtikar in CM Eknath Shinde Group and Son Amol In Uddhav Thackeray Group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manasi Naik | घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

Sanjay Raut On Gajanan Kirtikar | ‘शिवसेनेत सर्व काही भोगून किर्तीकर गेले, जाऊद्या, लोक उद्या त्यांना…’ – खा. संजय राऊत