Manasi Naik | घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मागच्या काही दिवसांपूर्वीच मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) ची पोस्ट जोरात व्हायरल झाली होती (Post Goes Viral). त्यामुळे तिच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचे बोलले जात होते. अशातच पुन्हा एकदा मानसी नाईकने एक व्हिडिओ शेअर केला आहे जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. आधीच्या पोस्टवर मानसीने (Manasi Naik) “वाईट बातमी – कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत टिकत नाही, चांगली बातमी – कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत टिकत नाही” अशा आशयाची होती. तर आता तिचा हा व्हिडिओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

मानसी नाईक सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह दिसते आणि तिचे पोस्ट देखील नेहमीच व्हायरल होत असतात. मानसीने तिच्या इंस्टाग्रामवर (Instagram Post) नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो मानसी तिच्या मांजरी सोबत खेळताना दिसत आहे. तर व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला ‘प्रेम में तोहरे…’ (Prem Mein Tohre) हे ‘बेगम जान’ (Begum Jaan) चित्रपटातील गाणं वाजताना ऐकू येत आहे. तर मानसीने कॅप्शन मध्ये असे लिहिले कि, “समझदारी जिंदगी को बेरंग कर देती है… धन्यवाद” या पोस्टबरोबर तिने #Universe हा हॅशटॅग वापरला आहे. एकंदर ती दुःखी असल्याचे पोस्टमध्ये दिसत आहे.

 

19 जानेवारी 2021 रोजी मानसी (Manasi Naik) आणि प्रदीप खरेरा (Pardeep Kharera) यांचे लग्न झाले होते.
या आधी काही काळ दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात होते.
मानसी आणि प्रदीप नेहमीच एकमेकांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत होते.
पण आता दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्राम वरून हे फोटो डिलीट केले आहेत.
तर आता लवकरच हे दोघे वेगळे होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

Web Title :- Manasi Naik | manasi naik sad instagram post goes viral after rumours of separation with husband

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा