Amol Kolhe On Gas Cylinder Price | गॅस सिलिंडरच्या तीनवेळा पाया पडा, मग विचार करून मतदान करा, अमोल कोल्हेंचे मतदारांना आवाहन

राजगुरूनगर : Amol Kolhe On Gas Cylinder Price | २०१४ ला गॅस सिलिंडरची किंमत ४५० रुपये होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सांगितले होते, गॅस सिलिंडरला पाया पडा आणि मग मतदानाला जा. आज गॅस सिलिंडरचे भाव हजाराच्या पुढे गेलेत. त्यामुळे तीनवेळा पाया पडा, मग विचार करून मतदान करा, असे आवाहन महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) उमेदवारी डॉ. अमोल कोल्हे यांनी मतदारांना केले. खेड तालुक्यातील वाडा येथे प्रचार दौऱ्यात गावातील हरिनाम सप्ताहाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.(Amol Kolhe On Gas Cylinder Price)

अमोल कोल्हे म्हणाले, वाचा शुद्धी, वर्तन शुद्धी आणि हेतू शुद्धी महत्त्वाची आहे.
निवडणुका येतात जातात, पदे येतात जातात, पण त्यातला माणूस टिकला पाहिजे. हीच भगवंतांची शिकवण आहे.
संतांनी प्रत्येकाला आत्मभान दिले. देश पुढची पाच वर्षे कोणाच्या हातात राहणार आहे, हे ठरवणारी ही निवडणूक आहे.

जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो, आणि देहाकडून देवाकडे जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्या मध्ये देश लागतो.
त्यामुळे देशाच्या भवितव्यासाठी मतदान करा, असे आवाहन कोल्हे यांनी केले.

यावेळी अमोल कोल्हे यांच्यासोबत अमोल पवार, अशोक खांडेभराड, बाबाजी काळे, आबा धनवटे, अतुल देशमुख,
सुधीर मुंगसे, नीलेश कड, मयूर दौंडकर, राजमाला बुट्टे पाटील, सोमनाथ मुंगसे, सुधीर भोमाळे, संजय घनवट आदी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Eknath Shinde-Ajit Pawar | महायुतीच्या जागावाटपात CM शिंदें ठरले वरचढ, मिळवल्या 15 जागा, अजित पवारांच्या पदरी निराशा

Sunetra Pawar On Supriya Sule | सुप्रिया सुळेंवर टीका करताना सुनेत्रा पवारांचा दावा, ”दहा वर्षे विरोधी बाकांवर बसणाऱ्या खासदारामुळे बारामतीचे प्रचंड नुकसान”