Amol Mitkari | बाळासाहेबांच्या नावाने चिन्ह मागण्यापेक्षा तुम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावाने चिन्ह मागा – अमोल मिटकरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शिवसेनेच्या अंतर्गत वादावर पडदा टाकला आहे. अंधेरी पूर्व येथे होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला हंगामी नावे आणि चिन्हे देण्यात आली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena-Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या गटाला ‘मशाल’ हे बोधचिन्ह मिळाले, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena of Balasaheb) हे नाव आणि ‘ढाल-तलवार’ चिन्ह मिळाले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA)  अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाष्य केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने चिन्ह मागण्यापेक्षा तुम्ही नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्या नावाने चिन्ह मागा, असा सल्ला अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला दिला आहे.

अमोल मिटकरी (Amol Mitkari) सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना चांगलेच धारेवर धरले. जनसंघ, काँग्रेस (Congress) या पक्षांनी देखील आपली निवडणूक चिन्हे गमावली. त्यामुळे त्यांना फारसा फरक पडला नाही. बाळासाहेब ठाकरे हे नाव ज्या ठिकाणी आहे, तेथे शिवसैनिकांचे (Shiv Sainik) रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मशाल चिन्हालाच (Mashal Symbol) लोक पसंती देतील, असे मिटकरी म्हणाले.

अंधेरीतील पोटनिवडणूकीत (Andheri East by-Election) शिवसेनेचा ठाकरे गट जिंकेल.
धनुष्यबाण चिन्ह जरी गोठवले असले, तरी शिवसैनिकांचे रक्त पेटविले आहे. राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस
(INC) पक्ष शिवसेनेच्यासोबत आहे. शिवसेनेला मित्रपक्ष म्हणून आमचा पाठिंबा आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले.
यावेळी बोलताना मिटकरी यांनी शिंदे यांच्या गटात गेलेल्या बंडोबांचा चांगलाच समाचार घेतला होता.

Web Title :- Amol Mitkari | amol mitkari criticizes eknath shinde group over party symbol

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा