Amravati News : 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – अमरावती जिल्ह्यामध्ये एका 12 वर्षाच्या आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी एका 34 वर्षाच्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी विठ्ठल कामटे (वय-34) याला पोलिसांनी तासभरातच अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी व आरोपी एकाच गावात राहतात. आरोपीने मुलीला गावजवळील एका ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीच्या आईने तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडित मुलगी इयत्ता 7 वीमध्ये शिकत आहे. तिवसा पोलिसांनी आरोपी विरोधात बलात्कार, पॉस्कोसह अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.