Amravati ACB Trap | 5 हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह हवालदारावर एसीबीकडून FIR

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – चोरीच्या (Theft) दाखल गुन्ह्यात अटक (Arrest) न करण्यासाठी आणि अटक केली तर लवकर जामीन मिळण्यासाठी (Bail) मदत करण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपये लाच मागणाऱ्या (Demanding Bribe) सहायक पोलीस उपनिरिक्षकासह (ASI) हवालदाराला (Constable) बुधवारी (दि.12) अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Amravati ACB Trap) अधिकाऱ्यांनी अटक करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरुद्ध भातकुली पोलीस ठाण्यात (Bhatkuli Police Station) एसीबीने (Amravati ACB Trap) गुन्हा दाखल केला आहे.

सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन प्रल्हादराव खुरकटे Gajanan Pralhadarao Khurkate (वय-56) व हवालदार मोहम्मद इस्माईल शेख उमर Mohammad Ismail Shaikh Umar (वय-52) असे गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केलेल्या लाचखोर पोलिसांची नावे आहेत. तक्रारदार यांच्यावर भातकुली पोलीस ठाण्यात शेतातील पाण्याची मोटर चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटक न करण्याकरता, अटक केली तर लवकर जामीन मिळावा यासाठी मदत करण्यासाठी खुरकटे व मोहम्मद इस्माईल यांनी लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी अमरावती एसीबीकडे (Amravati ACB Trap) लेखी तक्रार केली.

अमरावती एसीबी युनिटने पडताळणी केली असता तक्रारदार यांच्याकडे खुरकटे व मोहम्मद इस्माईल यांनी पाच हजार रुपये लाच मागून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. 3 ऑक्टोबर रोजी सापळा कारवाई दरम्यान खुरकटे व मोहम्मद इस्माईल यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. परंतु लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने बुधवारी दोघांना अटक केली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे (Amravati Region)
पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड (SP Vishal Gaikwad), अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत
(Addl SP Arun Sawant) व देविदास घेवारे (Addl SP Devidas Gheware),
पोलीस उपअधीक्षक संजय महाजन (DySP Sanjay Mahajan) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक संतोष इंगळे (Police Inspector Santosh Ingle) व सतीश उमरे
(Police Inspector Satish Umre), पोलीस अंमलदार विनोद कुंजाम, निलेश महिंगे, युवराज राठोड,
रोशन खंदारे, चालक सतीश कीटकुले, प्रदीप बारबुद्धे यांच्या पथकाने केली.

Web Title – Amravati ACB Trap | amravati acbs trap on bhatkulis bribe taking asi the constable also arrested crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा