Thackeray Group | निवडणूक आयोगावर शिवसेनेचे गंभीर आरोप, तुमच्या भूमिकेमुळेच शिंदे गटाला आमची रणनिती समजली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय निवडणूक आयोगावर (Central Election Commission) शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Thackeray Group) गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेने (Shivsena) म्हटले आहे की, तुमच्या भूमिकेमुळेच शिंदे गटाला (Shinde Group) आमची रणनिती समजली. तसेच पक्ष चिन्ह आणि नावाच्या वाटपामध्ये विरुद्ध बाजूला झुकते माप दिले गेल, असे गंभीर आरोप करणारे 12 मुद्दे असलेले पत्र शिवसेनेने निवडणूक आयोगाला लिहिले आहे. थोड्या वेळापूर्वी हे तक्रार पत्र ठाकरे गटाच्या (Thackeray Group) वकिलांनी निवडणूक आयोगात सादर केले.

 

शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Thackeray Group) गंभीर आरोप करताना या पत्रात म्हटले आहे
की, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. याच निवडणूक आयोगाने चिन्हासंदर्भात जे निर्णय घेतले, त्या सर्व निर्णयांमध्ये उघडउघडपणे पक्षपातीपणा केला आहे. आम्ही दिलेले चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगाने जाणून-बुजून दुसर्‍या बाजूला कळतील, अशा पद्धतीने वेबसाईटवर टाकले. तुमच्या याच भूमिकेमुळे शिंदे गटाला आमची सगळी रणनिती समजली.

 

शिवसेनेने पत्रात म्हटले आहे की, निवडणूक आयोगानेच आमची सगळी रणनीती शिंदे गटाकडे उघड केली.
आमच्याच यादीतील चिन्ह आणि नावाचे पर्याय शिंदे गटाने कसे सादर केले? हे सर्व निवडणूक आयोगाच्या मदतीमुळेच शक्य झाले.

 

Web Title :- Thackeray Group | it was because of role of election commission that shinde faction knew our strategy serious allegations of thackeray group uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे रडीचा डाव खेळत आहेत; ‘मशाल चिन्ह मिरवून झाल्यावर …’ नरेश म्हस्के यांचा हल्लाबोल

Eknath Khadse | विरोधी पक्ष विखुरलेले राहावेत, तसं भाजपचं कारस्थान असू शकतं, एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली शंका

Pune Motor Driving School | महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलला पुन्हा एकदा ‘अ’ दर्जा गुणवत्ता मानांकन