Amruta Dhongade | बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच अमृता धोंगडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत ; “जाळ अन् धूर संगटच….”

पोलीसनामा ऑनलाइन : Amruta Dhongade | नुकताच बिग बॉस मराठीचा चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. यंदाचा बिग बॉसचा विनर अक्षय केळकर झाला. टॉप फाइव्ह मध्ये अक्षय केळकर सोबत अपूर्वा नेमळेकर, किरण माने, राखी सावंत व अमृता धोंगडे या सदस्यांची वर्णी लागली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच अमृता खूपच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या दिवसापासूनच तिने घरात तिचे वेगळे असे स्थान निर्माण केले होते. (Amruta Dhongade)

घरामध्ये अमृताची एक वेगळीच भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तर अनेकदा टास्क दरम्यान तिने घेतलेली आक्रमक भूमिका ही प्रेक्षकांना आवडली होती. अमृताचे घरातील वावर आणि खेळीने तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता घरातून बाहेर पडताच अमृतांनी पहिली पोस्ट शेअर केली. सध्या ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Amruta Dhongade)

या पोस्टमध्ये अमृताने प्रेक्षकांचे आभार मानले आहे. पोस्ट शेअर करत अमृता म्हणाली “थँक्यू कलर्स मराठी आणि अमृताची गॅंग….. महाराष्ट्राची मिरची कडून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार….. तुमच्या या प्रेमासाठी मी कायमच ऋणी राहील……. वर्चुअल भेट तर गेले 100 दिवस होतच होते आता प्रत्यक्षात लवकरच भेटूयात….. असेच प्रेम कायम ठेवा, जाळ अन् धूर संगटच”. असे म्हणत तिने पोस्ट शेअर केली. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे.

अमृताच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या. तर काहींनी तिला पाठिंबा देखील दर्शवला.
अमृताला सर्वात जास्त प्रसिद्धी छोट्या पडद्यावरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतून मिळाली आहे. याआधी अमृता अनेक मालिकांमध्ये देखील झळकली होती.

Web Title :- Amruta Dhongade | bigg boss marathi 4 amruta dhongade post after loss the trophy of the season

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र प्रवासावर बोलले संजय राऊत; म्हणाले…

Amitabh Bachchan | महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘या’ कृत्यामुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल ; बिग बींनी चाहत्यांची मागितली माफी

Shripal Sabnis | राज्यपालांवर टीका करताना ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘नालायक राज्यपाल, अवदसा येऊन…’