Amitabh Bachchan | महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘या’ कृत्यामुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल ; बिग बींनी चाहत्यांची मागितली माफी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Amitabh Bachchan | कधी कधी कलाकारांच्या एका चुकीमुळे नेटकरी त्यांना ट्रोल केल्याशिवाय सोडत नाहीत. असाच प्रसंग महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर ओढावला आहे. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. जास्त करून ते ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. आता अमिताभ बच्चन कडून ट्विट करण्यात एक मोठी चूक झाली असल्याची माहिती त्यांनी स्वतःच देत चाहत्यांची माफी देखील मागितली आहे. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. (Amitabh Bachchan)

 

अमिताभ बच्चन ट्विटरच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करत असतात. अलीकडेच त्यांनी एक ट्विट केले होते. मात्र त्या ट्वीटमध्ये त्यांच्याकडून एक चूक झाली आणि ही चूक म्हणजे त्यांनी त्या ट्विटला चुकीचा नंबर दिला होता. जेव्हा ही चूक त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी ती सुधारत चाहत्यांची माफी मागितली. यावेळी अमिताभ बच्चन यांनी लिहिले की,”T4515 मोठी चूक, T 4514 नंतर माझे पूर्वीचे सर्व ट्विट चुकले आहेत. T 5424,5425,5426,4527, 5428, 5429, 5430.. सर्व नंबर चुकीचे आहेत.. ते T4515,4516,4517,4518,4519 4520,452 असायला हवे होते. याबद्दल मी माफी मागतो.” (Amitabh Bachchan)

 

त्यांच्या या ट्विट नंतर अनेकांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केले. तर काहींनी मजेशीर कमेंट करत त्यांची खिल्ली देखील उडवली आहे. यावेळी एका युजरने म्हंटले कि,” सर बरं झालं हे तुम्ही आम्हाला दाखवून दिल धन्यवाद मला झोप येत नव्हती”. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले “बाजार उद्या कोसळेल”. तर आणखीन एका युजरने म्हटले की “सर माफीची स्पेलिंग चुकीचे आहे कृपया T4516 मध्ये ते दुरुस्त करा” आता नेटकऱ्यांनी या ट्वीट वरून त्यांना ट्रोल करण्याची कोणतीच संधी सोडली नाही.

अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास नुकतेच ते ‘गुडबाय’ या चित्रपटात दिसले होते.
या चित्रपटाने जरी बॉक्स ऑफिसवर खास धमाल केली नसली तरी येणाऱ्या काळात अमिताभ बच्चन ‘आदीपुरुष’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
या व्यतिरिक्त अमिताभ बच्चन प्रभास आणि दीपिकाच्या ‘प्रोजेक्ट के’ मध्येही झळकणार आहेत.

 

Web Title :- Amitabh Bachchan | amitabh bachchan got trolled on twitter because of his wrong tweet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | कोरेगाव पार्कमधील महिलेचे लपून फोटो काढणे गुप्तहेरांना आले अंगाशी; पोलिसांनी सापळा रचून केली अटक

Gold-Silver Rate Today | कोरोना काळातील उच्चांकी दराजवळ पोहोचले सोने, जाणून घ्या आजचे दर

Dr Vishwas Mehendale Passed Away | ज्येष्ठ माध्यमकर्मी, दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन