परभणीत अज्ञात वस्‍तुचा स्‍फोट, एक जण गंभीर

परभणी : पोलीसनामा  आॅनलाईन-

शहरात एका अज्ञात वस्तूचा स्फोट झाल्याची घटना नांदखेडा रोडवर आज (गुरुवार) सकाळी घडली. भर रस्त्यावर झालेल्या स्फोटामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले असून, स्फोटात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

[amazon_link asins=’B01MU7ZZJV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4c654eac-8b42-11e8-b6a9-9ff36e2e3f94′]

संजय अग्रवाल असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना जवळच असलेल्या संतोष नागनाथ डोगंरे यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बाॅम्बशोधक पथक दाखल झाले आहे.