Ananya Pandey – Aditya Roy Kapur | अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूर रिलेशनशिपमध्ये? त्या व्हिडिओने आले चर्चेला उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Ananya Pandey – Aditya Roy Kapur | सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक सेलिब्रिटी एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiyara Advani) येत्या वर्षात लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. यानंतर आता यामध्ये अनन्या पांडे -आदित्य रॉय कपूर यांच्या नावाची भर पडली आहे. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होत्या. यानंतर आता या दोघांचा दिवाळी पार्टीतील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये हे दोघे एकत्र पोज देताना दिसत आहेत.

गुरुवारी मनीष मल्होत्राने (Manish Malhotra) दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. विशेष म्हणजे या पार्टीत अनन्या आणि आदित्यही (Ananya Pandey – Aditya Roy Kapur) पोहोचले होते, तेही जवळपास एकाच वेळी. इथे पोहोचल्यावर दोघांनी फोटोसाठी एकत्र पोजसुद्धा दिली. तसेच दोघांनी यावेळी एकाच रंगाचे कपडे घातले होते. मात्र, पार्टीत पोहोचलेल्या सर्व स्टार्सचे कपडे अशाच रंगाचे होते. या दोघांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.

या व्हिडिओवर अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे तर काहीजणांनी
नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडिओवर कमेंट करून काही जणांनी अनन्या पांडेला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
एकाने या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले कि, ‘नाही… ही मुलगी आदित्य रॉय कपूरची गर्लफ्रेंड असू शकत नाही.’
आता हे दोघे खर्च एकत्र आहेत की त्यांच्या येणाऱ्या चित्रपटासाठी हा प्रमोशनल फंडा आहे हे काही दिवसांत समोर
येईल.

Web Title :-  Ananya Pandey – Aditya Roy Kapur | ananya panday aditya roy kapur poses together at manish malhotra diwali party watch video