Ananya Pandey | अनन्या पांडे हिने सोशल मीडियावरील द्वेष आणि अपमानाबद्दल मांडले स्पष्ट मत

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची चुलबुली अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) ही तिच्या आगामी चित्रपटाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. अनन्याने तिचा अगदी कमी वेळामध्ये मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. अनन्याचा लवकरच ‘ड्रीम गर्ल 2’ हा चित्रपट (Dream Girl 2 Movie) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये अनन्या पांडे आणि अभिनेता आयुष्मान खुराणा (Ayushmann Khurrana) यांनी स्क्रीन शेअर केली आहे. हा चित्रपट 2019 साली प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असून प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) आणि आयुष्मान खुराणा हे दोघेही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. दरम्यान अनन्याने सोशल मीडियावर तिला दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर स्पष्ट मत मांडले आहे.

प्रसिद्ध स्टार किड असणारी अनन्या पांडे ही तिच्या चित्रपटाबरोबरच तिच्या हटके फॅशन स्टाईलसाठी नावाजली जाते. ती सध्या ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत असून हा चित्रपट येत्या 25 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस (Dream Girl 2 Release Date) येणार आहे. प्रमोशनचे अनेक व्हिडिओ समोर येत असून अनन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने सोशल मीडियावर तिचा केला जाणार अपमान आणि प्रेम या दोन्हीबद्दल मत व्यक्त केले आहे. यामध्ये अभिनेत्री अनन्या पांडे म्हणाली की, “सोशल मीडियावर प्रेम आणि द्वेष दोन्ही दिले जातात. त्यावर नकारात्मकतेला देखील सामोरे जावे लागते. मी देखील त्याचा सामना करते आणि सोशल मीडियावरील ही नकारात्मकता हॅंडल करण्याचा प्रयत्न करत असते.” असे मत अनन्या पांडे हिने व्यक्त केले आहे.

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) हिने ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ (Student Of The Year 2) या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये दमदार पदार्पण केले. अनन्याचे ‘पती पत्नी और वो’ (Pati Patni Aur Woh), खाली पिली (Khaali Peeli), लायगर (Liger) हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. लवकरच तिचा ‘ड्रीम गर्ल 2’ हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. अभिनेत्री अनन्या पांडे ही तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लव्ह अफेअरमुळे (Ananya Pandey Affair) जास्त चर्चेत राहिली आहे. अनन्याचे अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) सोबतचे व्हेकेशन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. हे कपल सध्या एकमेकांना डेट करत असून त्यांना अनेकांची पसंती मिळत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | ‘राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते’, सुप्रिया सुळेंचे मोठे विधान (व्हिडीओ)