NCP MP Supriya Sule | ‘राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते’, सुप्रिया सुळेंचे मोठे विधान (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार यांनी बंडखोरी करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सामील होण्याचा निर्णय घेतल्याने पक्षात फूट पडली आहे. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत सरकारमध्ये सामील झाले आहेत. तर काही नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुठलीही फूट नाही. अजित पवार हे पक्षातील ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत, असे सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) म्हणाल्या. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली नाही

पुण्यात माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी सांगितले की, राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली नाही. पक्षातील काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्याबाबत आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) तक्रार केलेली आहे. अजित पवार हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पण त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मात्र शरद पवार हेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर जयंत पाटील (Jayant Patil) हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्या दोघांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

अजित पवार यांचं पक्षातील सध्याचं स्टेटस काय? या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. आता त्यांनी पक्षाच्या विरोधात काही भूमिका घेतली आहे. त्याची तक्रार आम्ही महाराष्ट्र विधानसभेत अध्यक्षांकडे केली असून त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहात आहोत.

भाजपसोबत आघाडी नाही

आमच्या पक्षाची भाजपशी (BJP) कुठलीही युती किंवा आघाडी नाही. आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतल्याचे आमच्या लक्षात आलं, तेव्हा प्रक्रियेनुसार आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे आमचं म्हणणं सादर केलं आहे. राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये संभ्रम नाही. आम्ही कुठलीही गुप्त बैठक घेतलेली नाही. पवार आणि चोरडिया कुटुंबाची माझ्या आणि दादाच्या जन्माआधीपासून मैत्री आहे. त्यामुळे त्यांच्या घरी जाण्यात कसली चोरी, असा प्रश्न त्यांनी विचारला.

भाजपने तीन वेळा राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न केला

भाजपने आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न केले.
भाजप त्यांची रणनिती सतत बदलत राहिल, शरद पवारंचे सर्वांशी चांगले संबंध असल्याने भाजपकडून सातत्याने ऑफर
येत होत्या. मात्र त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली नाही.
तिसऱ्या वेळी भाजपने सखोल रणनीती आखली आणि त्यांना यश आलं, ते राष्ट्रवादी फोडण्यात यशस्वी झाल.
तसेच राष्ट्रवादीचा गट सत्तेत आहे, पण तांत्रिकदृष्ट्या पक्षात फूट नाही,
असं यापूर्वी सुप्रीया सुळे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Katraj Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला गती! 50 पोलीस कर्मचाऱ्यांसह महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती

Maharashtra Political News | ‘देवेंद्र फडणवीस खोटारडा माणूस, लगेच बदलले’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा हल्लाबोल