तब्बल ८००वर्षांपूर्वीचे शिवलिंग सापडले

नांदेड : वृत्तसंस्था

होट्टल (ता. देगलूर) येथे गावाच्या बाहेर एका प्राचीन मंदिरात शिवपिंड सापडली असून, तहसीलदारांच्या सूचनेनुसार पुरातत्त्व विभागाच्या प्रतिनिधीने तिथे भेट देऊन ती न हलवण्याबाबत ग्रामस्थांना सूचित केले. त्यानंतर ग्रामस्थांनी शिवपिंडची विधिवत पूजा केली. होट्टल हे सिद्धेश्वराच्या हेमाडपंती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.

[amazon_link asins=’B00FT694AC,B002361MLA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2457ac0c-ba2d-11e8-a00e-7140b5a33c3b’]

याबाबत इतिहासाचे अभ्यासक डॉ. किरण देशमुख म्हणाले, होट्टल येथे चालुक्य काळातील सिद्धेश्वर आणि पार्वतीचे मंदिर आहे. या दोन्ही मंदिरांचा जीर्णोद्धार झाला, परंतु गावाबाहेर आणखी एक मंदिर असून त्या परिसरात बारकाईने उत्खनन होण्याची आवश्यकता आहे.
काही ग्रामस्थ गावालगत पूर्वेला मोकळ्या जागेत बसले असता, मातीखाली काहीतरी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हाताने माती बाजूला केली असता, मंदिरासारखी वास्तू असल्याचे जाणवले. त्यानंतर ही बाब तहसीलदारांना कळविण्यात आली. तहसीलदारांनी पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधल्यानंतर या विभागाचे नांदेड येथील कर्मचारी निजामुद्दीन होट्टल येथे पोहोचले. तेथे खोदकाम केले असता पिंड सापडली. पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यानी ही पिंड आहे त्या स्थितीत ठेवण्याची सूचना केली. त्यानुसार पिंड तशीच ठेवून त्याची विधिवत पूजाअर्चा करून महाप्रसाद करण्यात आला. गावाच्या पूर्वेला शिवारात हे मंदिर आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाचे निजामुद्दीन म्हणाले, अंदाजे ८०० वर्षांपूर्वीचे हे  शिवलिंग असून त्याचा आकार अंदाचे चार बाय चार फूट असावा. या बाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान वाढदिवस साजरा करणार वाराणसीत

दरम्यान, पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षाने या भागातील प्राचीन अवशेष अजूनही लुप्त अवस्थेत असून, या विभागाने कालबद्ध कार्यक्रम आखून प्राचीन ठेवा लोकांसमोर आणावा, अशी मागणी होत आहे.