Andheri By-Election | अंधेरी पोटनिवडणुक : शिवसेनेत गैरसमज पसरवण्याची मनसेची खेळी, म्हणाले – ‘ऋतुजा लटकेंचा राजीनामा लटकवण्याचा अनिल परबांचा डाव’

मुंबई : Andheri By-Election | मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनाने शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवार आणि दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke ) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rituja Latke) यांचा पालिकेतील नोकरीचा राजीनामा (Resignation) मंजूर न केल्याने शिवसेना अडचणीत आली आहे. दुसरीकडे हा राजीमाना शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) महापालिका प्रशासनावर दबाव आणून अडकवल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. मात्र, आता मनसेने (MNS) नवीनच माहिती देऊन शिवसेनेत गैरसमज पसरवण्याची खेळी खेळली आहे. (Andheri By-Election)

मुंबई महापालिका प्रशासन ऋतुजा लटके यांचा राजीमाना मंजूर करत नसल्याने शिवसेनेने हायकोर्टात धाव घेतली आहे. आता याबाबतचा निर्णय हायकोर्टात होणार आहे. तत्पूर्वी मनसेचे कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण (Manoj Chavan) यांनी अनिल परबांवर (Anil Parab) आरोप केला आहे की, मुळात ऋतुजा लटकेताईंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकवून अंधेरी विधानसभेची उमेदवारी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांना देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे नेते अनिल परब यांचा डाव आहे. लटके वहिनींनी हा डाव ओळखावा इतकेच.

लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यात अडवणूक करून त्यांना मंत्रिपदाची ऑफर शिंदे गटाने (Shinde Group) दिल्याचे वृत्त आहे. ही चर्चा सुरू होताच शिवसेनेने सावध होत अंधेरी पोटनिवडणुकीसाठी (Andheri By-Election) प्लॅन बी तयार केला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाकडून अन्य शिवसैनिकाला तिकीट देण्याची तयारी सुरू आहे. विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले की, मुंबई महापालिकेकडून अद्याप ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर झाला नाही. कदाचित सत्ताधार्‍यांचा आयुक्तांवर दबाव असेल. लोकशाहीत नियमानुसार काम करणे गरजेचे आहे. राजीनामा मंजूर न झाल्यास प्लॅन बी तयार आहे.

14 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
हायकोर्टात (High Court) ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
या निर्णयात लटकेंच्या राजीनामाच्या बाजूने निर्णय न आल्यास प्लॅन बीनुसार ठाकरे गटाने याठिकाणी 3 जणांपैकी
एकाला उमेदवारीची संधी देण्याची तयारी केली आहे.
प्रमोद सावंत, विश्वनाथ महाडेश्वर आणि कमलेश राय (Kamlesh Rai) यांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.
या जागेवर भाजपाच्या (BJP) मुरजी पटेल यांचे नाव भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना
(BJP-Balasahebnchi Shivsena) युतीकडून चर्चेत आहे.
परंतु अद्याप उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नाही.

Web Title :- Andheri By-Election | anil parabs plan to nominate vishwanath mahadeshwar in andheri by election mns advice to rituja latke

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा