Thank God Movie | अजय देवगणचा ‘थँक गॉड’ चित्रपट रिलीजपूर्वी ‘या’ कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अजय देवगणचा (Ajay Devgan) थँक गॉड (Thank God Movie) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटावर (Thank God Movie) बंदी घालण्याची मागणी लोकांकडून करण्यात येत आहे. एवढेच नाहीतर वकील मोहनलाल शर्मा (Advocate Mohanlal Sharma) यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता चित्रपटाच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

 

वकील मोहनलाल शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेत हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) आणि चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाऊ नये असे लिहिण्यात आले आहे. या चित्रपटात भगवान चित्रगुप्त (Bhagwan Chitragupta) यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. चित्रपटात चित्रगुप्तांचा अपमान केल्याने कायस्थ समाजाच्या (Kayastha society) भावना दुखावल्या गेल्याचे सांगण्यात आले आहे.

 

एवढेच नाहीतर या याचिकेत म्हणण्यात आले आहे कि, काहीही झाले तरी कायस्थ समाज हा चित्रगुप्तांचा अपमान सहन करणार नाही.
जर थँक गॉड चित्रपट (Thank God Movie) रिलीज झाला तर देशातील शांतता खराब होऊ शकते असेदेखील या याचिकेत म्हणण्यात आले आहे.
हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.
न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे हा चित्रपट रिलीज होणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :- Thank God Movie | ajay devgns film thank god is mired in controversy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gopichand Padalkar | आमदार गोपिचंद पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाची सांगितली दुरावस्था

Pune Gang Rape | गुंगीकारक स्प्रे मारुन महिलेवर सामुहिक बलात्कार; कोंढवा परिसरातील खळबळजनक घटना

All India Marathi Film Corporation Election | मतदार यादीत नाव नसल्यास कोल्हापुरात जाऊन हरकत घ्या, निवडणूक अधिकाऱ्याचा अजब फतवा