Video : टॉलीवूड अभिनेत्याच्या फिल्मचा ‘ट्रेलर’ पाहण्यासाठी ‘चेंगराचेंगरी’

विशाखापट्टणम : टॉलीवूड अभिनेता आणि नेता पवन कल्याण याची आगामी ‘वकीलसाब’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी येथील एक चित्रपटगृहात चेंगराचेंगरी झाली. चाहत्यांनी चित्रपटगृहात असलेली काच तोडून आत प्रवेश केला.

तेलगु भाषी राज्यांमधील काही चित्रपटगृहातच सोमवारी दुपारी ४ वाजता ‘वकीलसाब’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज होणार होता. विशाखापट्टणममधील शरत चित्रपटागृहात हा ट्रेलर रिलिज होणार होता. तत्पूर्वी पवन कल्याण यांच्या चाहत्यांनी चित्रपटगृहावर दुपारी २ वाजताच गर्दी केली होती. त्यांनी तेथे पूजाअर्चा केली. चित्रपटगृहावर इतकी गर्दी झाली होती की आत जाण्यासाठी लोकांच्या रेट्याने तेथील काच फुटली. अनेक जण खाली पडले. त्यांना काचेचे तुकडे लागले. अनेक जण त्यात चेंगरले. तरी लोक आत शिरले.

पवन कल्याण हे तेलगु मध्ये लोकप्रिय अभिनेते असून दोन वर्षांनंतर त्यांचा चित्रपट पडद्यावर येत आहे़ बॉलीवूडची लोकप्रिय फिल्म ‘पिंक’ चा ‘वकीलसाब’ हा रिमेक आहे. ‘पिंक’मध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी केलेली भूमिका पवन कल्याण करत आहेत.