Anil Kapoor | अनिल कपूर यांचे मानधन ऐकून निर्मात्यांना धक्का; वेलकम चित्रपटाच्या फ्रेंचायझीमधील ‘उदय आणि मजनू भाई’ बदलणार

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) व अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या जोडीची आठवण काढली तरी डोळ्यासमोर ‘वेलकम’ हा चित्रपट येतो. ‘वेलकम’ या कॉमेडी चित्रपटाच्या (Welcome Movie) फ्रेंचायझीने प्रेक्षकांना पोट धरुन हसवले आहे. आता वेलकम या चित्रपटाचा तिसरा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome to The Jungle) असे असणार आहे. हा बहुप्रदर्शित चित्रपट पुढील वर्षी क्रिसमसच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वेलकम’ या फ्रेंचायझीमध्ये गँगस्टर उदय आणि मजनू भाई (Gangster Uday and Majnu Bhai) ही एक आयकॉनिक जोडी बनली आहे. मात्र आता निर्माते आणि मजनू भाईची भूमिका साकारणारे अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्यामध्ये मानधनाच्या बाबतीत एकमत न झाल्याने ते आता ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटामध्ये झळकणार नाहीत.

बॉलीवुड अभिनेते अनिल कपूर यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्य़ांच्या ‘वेलकम’ चित्रपटातील मजनू भाई या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. पण आता येणाऱ्या ‘वेलकम टू द जंगल’ या सिक्वेलसाठी त्यांनी जास्त पैसे मागितले आणि हे पैसे ऐकून निर्मात्यांचे देखील डोळे विस्फारले. अभिनेते अनिल कपूर यांनी ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला (Firoz Nadiadwala) यांना 18 कोटी रुपये मानधन म्हणून मागितले. अनिल कपूर यांची ही मागणी ऐकून निर्मात्यांना देखील धक्काच बसला. निर्मात्यांनी अनेकदा अनिल यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ही गोष्ट काही पुढे जाऊ शकली नाही. त्यामुळे अभिनेते अनिल कपूर हे या वेलकम चित्रपटाच्या सिक्वेल मधून बाहेर पडले आहेत.

‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटामध्ये बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) देखील असणार आहे. चित्रपटामध्ये तो आणि इतर अनेक सुपरस्टार असल्याने ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 300 कोटींच्या घरामध्ये कमाई करेल असे अनिल कपूर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनिल कपूर यांना 18 कोटी रुपये मानधन (Anil Kapoor Charges) हवे आहे. पण निर्मात्यासोबत हे डील न झाल्याने ते चित्रपटातून बाहेर पडले आहेत. अभिनेता अक्षय कुमार याने देखील अनिल कपूरला समजावण्याचा प्रयत्न केला तरी देखील हे काही जुळून आले नाही.

अभिनेते अनिल व नाना यांची जोडी पडद्यावर हिट असल्यामुळे आता अनिल यांनी चित्रपटातून एक्झिट घेतल्याने नाना पाटेकर यांनी देखील चित्रपट करण्यासाठी नकार कळवला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना ही सुपरहिट जोडी पुन्हा पडद्यावर झळकताना दिसणार नाही. पण अनिल व नाना ही जोडी जरी उदय आणि मजनू भाई (Anil Kapoor) म्हणून दिसणार नसली तरी पडद्यावरील आणखी एक सुपरहिट जोडी चित्रपटामध्ये घेण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतला आहे. मोठ्या पडद्यावरील लोकप्रिय मुन्ना भाई व सर्किट (Munna Bhai And Circuit) ही जोडी आता उदय आणि मजनू भाई म्हणून चित्रपटामध्ये झळकणार आहे.

अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) व अभिनेता अरशद वारसी (Arshad Warsi) यांच्या जोडीने देखील
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अनेक वर्षानंतर आता हे दोघे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी
‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर करणार आहे. प्रेक्षकांसोबतच चित्रपट निर्माते देखील आता या
नवीन स्टार कास्ट सोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. चित्रपटामध्ये अक्षय कुमार, संजय दत्त, अरशद वारसी
या कलाकारांसोबतच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez), दिशा पाटनी (Disha Patani) आणि
सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचे
दिग्दर्शन अहमद खान (Ahmad Khan) करणार असून चित्रीकरण थायलंड (Thailand), दक्षिण आफ्रिका (South Africa)
आणि मॉरिशसमध्ये (Mauritius) होणार आहे. ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट पुढच्या वर्षी अर्थात 2024 च्या
क्रिसमसच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस (Welcome To The Jungle Release Date) येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Power of Investing | लवकर करोडपती बनायचंय?, गुंतवणुकीच्या या तीन सवयी फॉलो केल्याने पूर्ण होईल स्वप्न

Pune Crime News | दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी डेक्कन पोलिसांकडून गजाआड