अंक ज्योतिष 12 मार्च : ‘हा’ मुलांक असणार्‍यांसाठी ‘शुभयोग’, जाणून घ्या तुमचा ‘लकी नंबर’ आणि ‘शुभ रंग’

पोलीसनामा ऑनलाइन  – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे. तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

अंक -1
व्यवसायात नवे संपर्क होतील. व्यापारात धनलाभ होईल, परंतु मेहनतीच्या तुलनेत कमी असेल. घरासाठी खरेदी कराल. कुटुंबात सुख-शांती राहिल. त्यांच्यासोबत फिरण्यासाठी जाल. मोठ्यांचे आरोग्य सारखे सारखे बिघडेल.
शुभ अंक -14
शुभ रंग – सोनेरी

अंक- 2
विवाहाची बोलणी पुढे सरकेल. प्रत्येक समस्येत कुटुंबासोबत राहाल. पती-पत्नीत ताळमेळ आणि सामंजस्य कायम राहिल. प्रियव्यक्ती सोबत डेटवर जाऊ शकता.
शुभ अंक -12
शुभ रंग- लाल

अंक – 3
आज संततीचे शिक्षण, कॉलेजची निवड, विषयांची निवड, करियर इत्यादीबाबत गोंधळ राहिल. तुम्हाला नोकरी आणि प्लेसमेंटकडून प्रस्ताव येऊ शकतो. आजारपणावर खर्च होऊ शकतो. काही लोकांच्या जीवनात प्रेमाची एन्ट्री होऊ शकते.
शुभ अंक – 19
शुभ रंग – पिवळा

अंक – 4
व्यापारात कुणालाही उधार देऊ नका. उधार पैसे द्यायचेच असल्यास व्यवहार चेकने करा. एखाद्या नातेवाईकाबाबत वाईट बातमी समजू शकते. ज्ञान प्रदर्षणात कमी पडू शकता. थोडे चतूर होणे गरजेचे आहे.
शुभ अंक – 6
शुभ रंग – गुलाबी

अंक-5
आज योग्यता आणि क्षमतेचा भरपूर वापर केल्यास यश नक्की मिळेल. राजकारणात मोठ्या लोकांशी संपर्क होईल. प्रेमी युगुल आणि पती-पत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात. विषय वाढवू नका. नवीन दागिने, कपडे खरेदी करू शकता.
शुभ अंक – 11
शुभ रंग – लाल

अंक- 6
आज तुमची व्यावसायिक किंवा अन्य माहिती लीक होऊ शकते. सावध राहा. नव्या लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका. प्रेमात रूसवे, फुगवे, समजावणे हे चालत राहिल. प्रेमात मर्यादेचे भान ठेवा अन्यथा जोडीदार नाराज होऊ शकतो. तुमच्यावर खोटा आरोप लागू शकतो. निरर्थक प्रवास करावा लागेल.
शुभ अंक – 15
शुभ रंग- हिरवा

अंक – 7
दुखापत होऊ शकते. आजारी पडू शकता. घरगुती स्तरावर निर्णय, जीवनशैलीत बदल कराल. व्यापारात लाभाची संधी मिळेल आणि मन आनंदी होईल. नोकरी मिळेल.
शुभ अंक – 5
शुभ रंग – सिल्व्हर

अंक – 8
सरकारी क्षेत्रात अडकलेली कामे प्रभावी व्यक्तीच्या मदतीने पुढे सरकतील. कामासाठी बाहेर जावे लागेल. विद्यार्थी आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रीत करतील. परीक्षेत यश मिळेल. आरोग्य आता चांगले राहिल.
शुभ अंक – 13
शुभ रंग – गुलाबी

अंक – 9
प्रेमी युगुलांच्या भेटीगाठी होत राहतील. सोबत प्रवास करू शकता. शुभयोग आहेत. पार्टीत खाण्या-पिण्यात वेळ जाईल. मित्रांसोबत वेळ घालवाल.
शुभ अंक – 10
शुभ रंग – सफेद