अंक ज्योतिष 21 मार्च : ‘हा’ मुलांक असेल तर आज ‘बॉस’ आणि ‘सहकारी’ होतील ‘खुश’, आजचा ‘लकी नंबर’ आणि ‘शुभ रंग’ जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे. तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

अंक – 1
आजचा दिवस उत्साहाचा आहे. आजचा दिवस नवीन संधी घेऊन येईल. काही महत्वाचे निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
शुभ अंक – 12
शुभ रंग – सोनेरी

अंक – 2
उतावळेपणाने कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. एकटेपणाची भावना वाढेल. आईचे सहकार्य तुमच्या अडचणी कमी करू शकते. सजणे, ब्यूटी पार्लर इत्यादीवर जास्त खर्च होईल शकतो. घरासाठी आवश्यक असणारे सामान खरेदी कराल.
शुभ अंक – 11
शुभ रंग – लाल

अंक – 3
आजचा दिवस अप्रत्यक्ष लाभ होण्याचा आहे. राजकारणात योग्य नियोजन केले तर वाढ होऊ शकते. मुलांच्या शिक्षणाबाबत थोडी चिंता वाढेल. संतती सुखात वाढ होईल.
शुभ अंक – 5
शुभ रंग – हिरवा

अंक – 4
विवाहितांना अडचणी येऊ शकतात. अनैतिक प्रेम संबंधामुळे आपली प्रतिमा खराब होण्याची शक्यता आहे. कन्फ्यूजनमुळे चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. संपत्तीबाबची प्रकरणे कोर्ट-कचेरीत मार्गी लागू शकतात.
शुभ अंक – 2
शुभ रंग – लाल

अंक – 5
तुमच्या बोलण्यातील नम्रता लोकांवर चांगला प्रभाव पाडू शकते. बॉस, सहकारी सर्वांना खुश कराल. अभ्यासातील गोडी वाढेल. आपल्या प्रिय व्यक्तीवर तुम्ही नाराज होऊ शकता. रूसवा काढण्याचे प्रकार सुरू राहतील.
शुभ अंक – 10
शुभ रंग – नारंगी

अंक – 6
भविष्याबाबत चिंता वाटू शकते. घरासाठी आवश्यक सामान खरेदी करू शकता. आजचा दिवस घरीच घालवाल. आज थोड नाराज दिसाल.
शुभ अंक – 5
शुभ रंग – काळा

अंक – 7
आज पैशाच्याबाबतीत चिंता वाढतील. कुठेतरी फिरण्याचे विचार मनात येतील. परंतु, तुम्ही एखाद्या भितीपोटी चालत जाणार नाही. दिवसातील बहुतांश वेळी सोशल मीडिया, टीव्ही आणि चित्रपट पाहण्यात घालवू शकता.
शुभ अंक – 3
शुभ रंग – पिवळा

अंक – 8
तुमची लोकप्रियता आज वाढेल. सोशल मीडियामध्ये अ‍ॅक्टिव्ह राहाल. एखादी चुकीची सवय जडण्याची शक्यता आहे. निरर्थक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका.
शुभ अंक – 19
शुभ रंग – केशरी

अंक – 9
व्यापारात नुकसान होऊ शकते. तुमचा आत्मविश्वास सुद्धा कमजोर पडू शकतो. अनेक नकारात्मक गोष्टी समोर येतील. परंतु घाबरून जाऊ नका. मनात सकारात्मक भाव ठेवा.
शुभ अंक – 15
शुभ रंग – सफेद