अंक ज्योतीष 6 मार्च : या मुलांकाचे लोक जे करतील, त्यात यश मिळेल, जाणून घ्या शुभ रंग आणि लकी नंबर

पोलीसनामा ऑनलाइन – 

अंक – 1
दाम्पत्य जीवनात जोडीदारासोबत सायंकाळ मस्त जाईल. कुटुंबात सुखशांती राहिल. पती-पत्नीमधील मतभेद संपुष्टात येतील. पैसा येईल, परंतु टिकणार नाही. मित्रांसोबत चांगले विचार जुळतील.
शुभ अंक – 6
शुभ रंग – पिवळा

अंक – 2
कार्यकुशलता कमी होईल. तुमचीच माणसं तुमचीे शत्रू होतील. मन विविध शंकांमुळे विचलित राहिल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. विवाहितांसाठी मौजमस्तीचा दिवस आहे. जोडीदाराला काहीही वाईट बोलू नका. सध्या तुम्हाला खुप सावध राहावे लागेल.
शुभ अंक- 10
शुभ रंग- लाल

अंक – 3,
जे करात, त्यामध्ये यश आवश्य मिळेल. लोकांशी संबंध असोत की, स्वताची कुशलता यश नक्की मिळेल. आज जे काम कराल ते पूर्ण केल्याशिवाय तुम्हाल समाधान वाटणार नाही. दिवस उत्तम आहे.
शुभ अंक- 9
शुभ रंग- खाकी

अंक – 4
विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळणार नाहीत. डोक्याऐवजी मनातून निर्णय घ्याल. मेहनत खुप कराल, पण सकारात्मक परिणाम मिळणार नाहीत. व्यापारात चुकांचे परिणाम सोसावे लागतील. जुने मित्र भेटतील, ज्यामुळे आनंद वाटेल.
शुभ अंक – 20
शुभ रंग – हिरवा

अंक – 5
कुटुंबात तणावाचे वातावरण राहिल. काम आणि व्यापार वाढविण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. इच्छेप्रमाणे यश मिळणार नाही. आर्थिक बजेट बिघडू शकते. पाहुणे येतील. खुप मेहनत केल्यास यश नक्की मिळेल.
शुभ अंक – 15
शुभ रंग – फिकट गुलाबी

अंक – 6
हसण्यासोबत दुख, सुखासोबत दुखाची सोबत राहिल. कामात आणि व्यापारात स्थिती मजबूत राहिल. जोडीदाराकडून भरपूर सहकार्य मिळेल. निरर्थक गोष्टींवरून वाद होऊ शकतात.
शुभ अंक – 12
शुभ रंग – हिरवा

अंक – 7
आयात निर्यात क्षेत्रात नुकसान होऊ शकते. प्रेमसंबंध खराब होऊ शकतात. किडनी रोगाने ग्रस्त जातकांच्या समस्या वाढू शकतात. वेळ मिळताच तपासणी करून घ्या. कुटुंबातील संबंध खुप चांगले राहणार नाहीत. सामाजिक संबंध वाढतील. कुणाच्याही बहकाव्यात येऊ नका. तुमच्यावर टीका होऊ शकते.
शुभ अंक- 23
शुभ रंग -फिकट निळा

अंक – 8
तुम्ही आनंदी आणि समाधानी राहाल. प्रेमविवाहाचा योग आहे. ऑफिसमध्ये अवघड काम मिळू शकते. परंतु, यश मिळेल. प्रवासासाठी जाऊ शकता. प्रिय व्यक्तीवर जास्त खर्च कराल. घरातील सामान खरेदी कराल.
शुभ अंक – 9
शुभ रंग – गुलाबी

अंक – 9
आज प्रवास करावा लागू शकतो. नोकरीत समस्या येईल. मोठ्या वयाच्या व्यक्तीबाबत जबाबदारी वाढेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी होईल. सर्वस्व देऊन काम केल्यास वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. औषध वेळेवर घ्या, अन्यथा समस्या वाढू शकते.
शुभ अंक – 2
शुभ रंग – हिरवा