MPSC परीक्षा वेळापत्रक जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन करू : प्रा लक्ष्मण हाके

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या १)राज्यसेवा पूर्व परीक्षा २)अभियांत्रिकी पूर्व परीक्षा ३) दुय्यम सेवा अराजपत्रित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या, त्यानंतर मराठा समाज आरक्षण स्थगिती च्या पार्श्वभूमीवर अचानक परीक्षा रद्द केल्या गेल्या, या सर्व गोष्टींचा परीक्षार्थी विध्यार्थांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला असून सरकारने ज्या पद्धतीने अकरावी प्रवेश प्रकरियेवरील स्थगिती उठवली त्या पद्धतीने २०२१ मध्ये MPSC चे वेळापत्रक जाहीर करावे.

मराठा समाज आरक्षण ही प्रकरिया न्यायप्रविष्ट असल्याने आणि अनिश्चित काळ लागणार असल्याने महाराष्र शासनाने या गोष्टीवर मार्ग काढावा. महेश झोरे यांनी परीक्षा वेळे वर होत नाही म्हणून सुसाईड नोट लिहून आत्महत्या केलेली आहे, या आत्महत्येला जबाबदार कोण? महाराष्ट्र शासन आणखी विध्यार्थ्यांचा बळी गेल्यानंतर जागे होणार आहे का? आज रोजी परीक्षार्थी पुण्यात अभ्यासाला आले आहेत पण २०२१ या वर्षात तरी परीक्षा होणार का या प्रश्नाने विध्याथी त्रस्त आहेत,त्याचबरोबर MPSC परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेले अधिकारी यांना अजून जॉइनिंग लेटर भेटत नाहीत, या आणि अशा गोष्टींचा शासनाने संवेदनशीलतेणे विचार करावा अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असे आवाहन प्रा लक्ष्मण हाके यांनी केले.