Anti Corruption Bureau (ACB) Nanded | 2 हजार रुपये लाच घेताना पकडलेला पोलीस कर्मचारी एसीबीच्या सापळ्यातून फरार

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau (ACB) Nanded | दोन हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने (Police Personnel) नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना चकमा देऊन पळून गेल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 20) सायंकाळी बिलोली तालुक्यातील (Biloli Taluka) कोंडलवाडी पोलीस ठाण्याच्या (Kondalwadi Police Station) हद्दीत घडली आहे.पोलीस हवालदार तैनात बेग मन्सब बेग ( Police Constable Tainat Beg Mansab Beg) याला दोन हजार रुपये लाच घेत असताना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau (ACB) Nanded) अधिकाऱ्यांनी पकडले होते.

याबबत 31 वर्षाच्या तक्रारदाराने नांदेड एसबीकडे 15 सप्टेंबर रोजी तक्रार केली.
तक्रारदार यांच्यावर कोंडलवाडी पोलीस ठाण्यात दाखल एन.सी मध्ये सी.आर.पी.सी कलम 107 प्रमाणे
कार्यवाही करुन प्रकरण मिटवुन घेण्यासाठी तैनात बेग याने 4 हजार रुपये लाच मागितली. तडजोडी अंती दोन हजार रुपये देण्याचे ठरले.

नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti Corruption Bureau (ACB) Nanded)
पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील (DYSP Rajendra Patil) यांच्या पथकाने सापळा रचला होता.
यावेळी बेग याने तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाच स्विकारून पैसे खिशात ठेवले.
त्यावेळी नांदेड एसीबीच्या (Nanded ACB) पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी पुढे सरसावले.
एसीबीचा ट्रॅप लक्षात येताच बेग दुचाकीवरुन पळून गेला.
नांदेड एसीबीच्या पथकाने बेग याचा बराच पाठलाग केला. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नाही.
याप्रकरणी मध्यरात्री बेग याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नांदेड परिक्षेत्राचे (Nanded Zone) पोलीस अधीक्षक डॉ राजकुमार शिंदे
(SP Dr. Rajkumar Shinde), अपर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण
(Addl SP Dharam Singh Chavan), पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक अरविंद हिंगोले (Police Inspector Arvind Hingole) ,
सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष शेट्टे (ASI Santosh Shette),
गजेंद्र मांजरमकर (ASI Gajendra Manjarmakar), पोलीस हवालदार एकनाथ गंगातिर्थ, संतोष वच्चेवार,
चालक पोलीस हवालदार सोनटक्के यांच्या पथकाने केली.

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Nanded | A policeman who was caught taking a bribe of Rs 2 thousand absconded from the ACB trap

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sharad Pawar On Raj Thackeray | मनसेच्या टीकेनंतर शरद पवारांनी मोजक्या शब्दात राज ठाकरेंना सुनावले; म्हणाले – हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा…

Workout | महिलांनो, असे करत असाल वर्कआऊट तर व्हा सावध; अन्यथा होऊ शकते दुप्पट नुकसान, जाणून घ्या कधी स्कीप करावी एक्सरसाईज