Anti Corruption Trap | 75 हजाराची लाच घेताना प्रभारी नायब तहसिलदारासह तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासाठी अजरा तहसिल कार्यालयातील उपलेखापाल तथा प्रभारी नायब तहसिलदार (महसूल) व तलाठी यांना 75 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. एसीबीने सापळा रचून केलेल्या (Anti Corruption Trap) या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. ही कारवाई आज (सोमवार) सकाळी करण्यात आली.

अजरा तहसिल कार्यालयातील उपलेखापाल तथा प्रभारी नायब तहसिलदार (महसूल) संजय श्रीपती इळके (Sanjay Shripati Ilke) (वय-52) आणि तलाठी राहूल पंडीतराव बंडगर (Rahul Panditrao Bandagar) (वय-33) असे लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी शिवसेना तालुकाप्रमुख युवराज शामराव पोवार (Shivsena taluka chief Yuvraj Shamrao Powar) यांनी तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युवराज पोवार यांनी वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासाठी तहसिल
कार्यालयाकडे प्रस्ताव ठेवला होता. याकामासाठी इळके व बंडगर यांनी 75 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत पोवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सोमवारी सकाळी सापळा रचून इळके आणि बंडगर यांना पैसे स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे महसूल विभागात (revenue department) खळबळ उडाली आहे.

ही कारवाई पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक सतीश मोरे, सहाय्यक फौजदार
संजीव बंबरगेकर, पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण, पोलीस नाईक सुनील घोसाळकर, पोलीस
कॉन्स्टेबल रुपेश माने यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध
विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले
आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

हे देखील वाचा

Pune Municipal Corporation | PMRDA ने तयार केलेला समाविष्ट 23 गावांचा प्रारुपविकास आराखड्यावरच; नागरिकांच्या हरकती सूचना मागविणार – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Anti Corruption Trap | while accepting bribe of 75 thousands talathi and prabhari nayab tehsildar arrested in ajara of kolhapur district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update