अनुष्का शर्मा भारतीय क्रिकेट संघात ?

लंडन : वृत्तसंस्था

नेटकरी जेवढे सेलिब्रेटिना हिट करतात तेवढेच ट्रोल देखील करतात. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे, बीसीसीआय ने भारतीय क्रिकेट संघाचा एक फोटो अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून शेअर केला आहे. या फोटो मध्ये क्रिकेट संघांसोबत विराट कोहलीची पत्नी अनिष्का शर्मा देखील उपस्थित आहे. या फोटोला नेटकरयांनी ट्रोल केले आहे. सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर असून, भारतीय क्रिकेटपटूंनी लंडनमधील भारतीय दुतावासाला भेट दिली. यावेळी हा फोटो काढण्यात आला होता .

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) खेळाडूंवर अनेक बंधने घालण्यात आल्यानंतर आता स्वतः बीसीसीआयनेच अनुष्का सोबतचा भारतीय संघाचा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केला आहे. यामुळे बीसीसीआय आणि अनुष्का शर्मा यांना सोशल मीडियात लक्ष्य करण्यात आले. या छायाचित्रात भारतीय क्रिकेट संघ आणि प्रशिक्षक एका विशेष पोशाखात दिसत आहेत. यांच्यासोबत अनुष्का शर्माही दिसत आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a9869ec2-9ada-11e8-bccd-e72de6544d66′]
या ट्विटवरून अनुष्का शर्मा चांगलीच ट्रोल झाली आहे. एकाने ‘हा भारतीय संघाचा फोटो आहे ,कौटुंबिक फोटो नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. अनुष्का शर्मा छयाचित्रात का ? अनुष्का भारतीय संघाची सदस्य आहे का? भारताचा उपकर्णधार शेवटच्या रांगेत आणि अनुष्का पहिल्या रांगेत हा काय प्रकार ? असे अनेक सवाल नेटकरयांनी केले आहेत .