UIDAI नंबर वरून गुगलवर माफी मागण्याची नामुष्की

वृत्तसंस्था

देशभरात काल अॅन्ड्रॉईड माेबाईलमध्ये UIDAI या नावाने १८००३००१९४७ हा क्रमांक आपाेआप सेव्ह झाला हाेता. मात्र हा नंबर UIDAI या नावाने सेव्ह झाल्यामुळे सर्वांनाच UIDAI चा हेल्पलाईन नंबर असल्याचा समज झाला. दरम्यान UIDAI ने याबाबत ट्विटरवर स्पष्टीकरण देत हा नंबर आपला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं, तेव्हा मात्र सर्वांची तारांबळ उडाली. नेमका हा नंबर माेबाईलमध्ये सेव्ह झाला कसा. याविषयी उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. हा एखादा हॅकिंगचा प्रकार असण्याचीही शक्यता निर्माण झाली हाेती. परंतु हा नंबर गुगलच्या चुकीमुळे सेव्ह झाला हाेता. याबद्दल गुगलने आपली चुक मान्य करत माेबाईल धारकांची माफी मागीलती आहे.

याविषयी गुगलने आपल्याकडून झालेल्या या चुकीबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. शुक्रवारी जेव्हा हा UIDAI या नावे १८००३००१९४७ हा क्रमांक अँड्रॉईड मोबाईल्समध्ये सेव्ह झाला तेव्हा या क्रमांकाशी आपला काहीही संबंध नसल्याचे UIDAI ने ट्विट करत स्पष्ट केले होते. तसेच मोबाईल सर्व्हिस प्रोव्हाईड करण्याऱ्या कंपन्यांनीही यासंदर्भात हात वर केले होते. मग हा क्रमांक मोबाईलमध्ये ऑटोसेव्ह कसा झाला असा प्रश्न सगळ्यांना पडला होता ज्याचे उत्तर गुगलची चूक असल्याचे आता समोर आले आहे.

आमच्याकडून जी चूक झाली त्याबद्दल आम्ही माफी मागतो. आमच्यामुळे मोबाईल धारकांना मनस्ताप सहन करावा लागला याचा आम्हाला खेद आहे असेही गुगलने म्हटले आहे.