iPhone लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात Apple कडून मोठी घोषणा

नवी दिल्ली : आयफोन निर्माता कंपनी Apple Inc. भारतात आपले नवे स्टोअर्स सुरु करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही वर्षांपासून Apple थर्ड पार्टीच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत आपले प्रॉडक्ट विक्रीस आणत आहे. मात्र, आता कंपनी हे सर्व बदलण्याच्या तयारीत आहे.

तज्ज्ञांच्या मते, Apple चे ऑनलाईन स्टोअर लाँच झाल्यानंतर मार्केट शेअर डिसेंबर 2019 पासून डिसेंबर  2020 पर्यंत 2 टक्के वाढले आहे. ऑनलाईन स्टोअरवर ऍपल आपल्या ग्राहकांना फायनान्सिंगसह अपग्रेडिंगची ऑफर देत आहे.

आम्ही आमचे नेटवर्क वाढवणार

आम्ही भविष्यात रिटेल स्टोअर्स उघडणार आहे. आमच्याकडून हे मोठे पाऊल असणार आहे. इथं आम्ही आमचे नेटवर्क, चॅनेल आणखीन विकसित करणार आहोत.

भारतीय बाजारपेठेत Apple चे लक्ष

भारतीय बाजार कंपनीसाठी अत्यंत चांगला राहिला आहे. यापूर्वी Apple ने जगातील काही बाजारांमध्ये विशेष लक्ष दिले आहे. भारतही त्यापैकी एक आहे. भारतात कंपनीचे शेअर जरी कमी असले तरीही यादरम्यान व्यवसाय जवळपास दुप्पट झाला आहे. हेच कारण आहे आता Apple भारतात विशेष लक्ष देत आहे.