Apple चा मोठा धमाका ! फक्त 195 रुपये दरमहा देऊन मिळावा Apple ची ही उत्कृष्ट सर्व्हिस, भारतासाठी विशेष योजना

पोलिसनामा ऑनलाईन – भारतीय बाजारासाठी पॉकेट फ्रेंडली सबस्क्रिप्शन सर्व्हिस खूप महत्वाची आहे. हे लक्षात घेऊन Apple कडून भारतीयांसाठी विशेष १९५ रुपयांच्या मासिक योजनेत Apple One सेवेची सदस्यता देण्यात आली आहे. Apple one सर्व्हिस बंडल ऑफरमध्ये Apple म्युझिक, Apple TV+, Apple Arcade आणि 50GB iCloud स्टोरेजसह सर्व प्रकारच्या सेवा मिळतील.

मिळत आहे एका महिन्याची मोफत ट्रायल
या प्रकारची सेवा मिळवणारा भारत पहिला देश ठरला आहे. कंपनी नवीन ग्राहकांसाठी Apple One सेवेची ३० दिवसांसाठी मोफत ट्रायल देत आहे, जे यापूर्वी Apple One सेवा वापरत नव्हते.

Apple चे दोन सदस्यता मॉडेल भारतात लाँच
Apple कडून मासिक १९५ रुपयांच्या रिचार्जवर केवळ एका डिव्हाइसवर Apple One सेवा ऍक्सेस केली जाऊ शकेल, तर एकापेक्षा अधिक डिव्हाईसवर ही सेवा वापरण्यासाठी फॅमिली प्लॅन लाँच केला गेला आहे. या योजनेवर कंपनीकडून 200GB iCloud स्टोरेज दिले जात आहे. यासाठी ग्राहकांना मासिक ३६५ रुपये रिचार्ज करावे लागेल. या रिचार्जवर Apple One सेवा ६ डिव्हाईसवर ऍक्सेस केली जाऊ शकेल.

प्रीमियम प्लॅन भारतात नाही होणार उपलब्ध
कंपनीचा दावा आहे की, Apple One सेवेच्या सध्याच्या सिंगल यूजर प्लॅनवर ग्राहकाला महिन्याला १७७ रुपये बचत होईल आणि फॅमिली पॅकवर दरमहा २०० रुपयांची बचत होईल. Apple One सेवेचा प्रीमियम प्लॅनही सुरू करण्यात आला आहे. पण तो भारतात उपलब्ध होणार नाही. ही योजना विशेषत: ऑस्ट्रेलिया, कॅनडा, यूके, यूएससाठी असेल. प्रीमियम योजनेत Apple च्या उर्वरित सेवेसह Apple News+, Apple Fitness+ सेवा आणि 2TB क्लाऊड स्टोरेज दिले जाईल. ते जास्तीत जास्त ६ लोकांमध्ये शेअर केले जाऊ शकते.