प्रत्यक्षात अवतरणार जगातील पहिली फ्लाईंग कार, मिळाली मंजूरी; 2022 पर्यंत आकाशासह रस्त्यावर देखील दिसणार

नवी दिल्ली : फ्लाईंग कारचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने एक पाऊल आणखी टाकण्यात आले आहे. फेडरल अ‍ॅव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (Federal Aviation Administration) ने हायब्रिड ग्राउंड-एयर व्हेईकल (Hybrid Ground-Air Vehicle) ला मंजूरी दिली आहे, जे 100 मैल प्रति तास वेगाने उड्डाण घेऊ शकते.

टेराफुगिया ट्रान्जेशन (Terrafugia Transition) ने एजन्सीकडून एक विशेष लाइट-स्पोर्ट एयरक्राफ्ट एयरवर्थनेस प्रमाणपत्र (Special Light-Sport Aircraft Airworthiness Certificate) प्राप्त केले आहे, ज्याचा अर्थ आहे की, तिला टेकऑफसाठी परवानगी मिळाली आहे.

अजूनपर्यंत या वाहनाचे केवळ उड्डाण घेणारे व्हर्जनच पायलट आणि फ्लाईंग स्कूलसाठी उपलब्ध आहे. रस्त्यावर धावणार्‍या व्हर्जनला मार्केटमध्ये येण्यास अजून सुमारे एक वर्षाच्या कालावधी लागू शकतो. या वाहनाला अद्याप रस्ते सुरक्षा नियमांच्या मानकानुसार प्रमाणपत्र मिळालेले नाही.

 

 

 

वैशिष्ट्य –
100-एचपी रोटॅक्स 912आयएस स्पोर्ट फ्यूल-इंजेक्टेड इंजिनद्वारे संचालित हे वाहन, 100 मैल प्रति तासाच्या कमाल वेगाने जवळपास 644 किमीच्या रेंजमध्ये 10,000 फुटाच्या ऊंचीचे उड्डाण घेऊ शकते.

माहितीनुसार, टेराफुगिया ट्रान्जेशनचे वजन अंदाजे 590 किलोग्रॅम आहे आणि यामध्ये फिक्स्ड लँडिंग गियर दिला आहे. तर याचे विंगस्पॅन 27 फुट रूंद आहेत. सोबतच याचे पंख दुमडून ते एखाद्या सामान्य कारप्रमाणे पार्क सुद्धा करता येते.

काय असेल किंमत
न्यूज रिपोर्टनुसार, ट्रान्जेशनच्या 2-सीटर मॉडलची किंमत सुमारे 2 कोटी 91 लाख रुपये होती. परंतु, आता 2022 मध्ये कंपनी आपले हायब्रिड ग्राऊंड-एयर व्हेईकल लाँच करेल ज्यानंतर याच्या किंमतीचा खुलासा होईल.