गुगलने सुरू केली फोटो हाईड करण्याची सुविधा, अशा प्रकारे लपवा पर्सनल फोटोज

नवी दिल्ली : वृत्त संस्था – टेक्नॉलॉजी कंपनी गुगल (Google) ने मागील महिन्यात आपल्या Google I/O संमेलनात गुगल फोटोसाठी अनेक सुविधांची घोषणा केली होती. त्या अंतर्गत कंपनीने गुगल फोटोजसाठी लॉक्ड फोल्डर फीचर (Locked Folder Feature) सुविधा सुरू केली आहे. ज्यामुळे यूजर्स पासकोड किंवा फिंगरप्रिंट (Passcode or Fingerprint) ने सुरक्षित फोल्डरमध्ये आपली संवेदनशील छायाचित्रे किंवा व्हिडिओ हाईड म्हणजे लपवू शकतात.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

लॉक केलेल्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेले फोटो किंवा व्हिडिओ फोटो ग्रिड, सर्च, अल्बम आणि रिसेंटमध्ये दिसणार नाहीत.
ते थर्ड पार्टी अ‍ॅप्समध्ये सुद्धा दिसणार नाहीत. मात्र, लपवलेल्या छायाचित्रांचा क्लाऊडवर बॅकअप घेता येणार नाही.
जर एखाद्या फोटो/व्हिडिओचा बॅकअप अगोदरच घेतलेला असेल तर गुगल ते क्लाऊडवरून हटवेल आणि केवळ स्थानिक रूपात फोल्डरमध्ये राहतील.

असा करू शकता वापर
यूजर्सला फीचरचा वापर करण्यासाठी त्यांना लायब्ररी युटिलिटीज लॉक्ड फोल्डरमध्ये जाऊन या नवीन लॉक्ड फोल्डरचा वापर सुरूकरावा लागेल.
एकदा वापरकर्त्याने यास सेट केल्यानंतर आपले सध्याचे फ़ोटो किंवा व्हिडिओ आपल्या लायब्ररीत टाकणे सुरू करू शकता.

गुगल कॅमेरा अ‍ॅपसुद्धा सेट करू शकता
यूजर्स नवीन फोटो किंवा व्हिडिओला थेट लॉक केलेल्या फोल्डरमध्ये सेव्ह करण्यासाठी गुगल कॅमेरा अ‍ॅप सुद्धा सेट करूशकतात.
या सुविधेचा वापर करण्यासाठी यूजर्सला कॅमेरा अ‍ॅप आपेन करावे लागेल.
वरील उजव्या कोपर्‍यात गॅलरी आयकॉनवर टॅप करावे लागेल आणि यादीतून ’लॉक्ड फोल्डर’ची निवड करावी लागेल.

सध्या केवळ Google Pixel स्मार्टफोन्सवर मिळेल सुविधा
ही सुविधा केवळ गुगल पिक्सल स्मार्टफोन्ससाठी जारी केली जात आहे,
ज्यामध्ये Google Pixel 3 grarO, Pixel 4 सीरीज आणि Pixel 5 आहे. मात्र, हे फीचर सध्या पिक्सल स्मार्टफोन्ससाठी एक्सक्लुझिव्ह बनले आहे.
कंपनीचे म्हणणे आहे की, ते इतर अँड्रॉईड डिव्हाईससाठी लॉक्ड फोल्डर रोल आऊट करतील आणि या वर्षी सुद्धा याचा वापर करू शकतील.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :apps google introduced the facility to hide photos in this way hide your personal photos and videos from others tech news amdm

हे देखील वाचा

कोण आहेत सुल्तान अन्सारी ज्यांनी दहा मिनिटात राम मंदिर ट्रस्टकडून कमावले साडे 16 कोटी; जाणून घ्या

आता मुंबईत झाडांवर होणार ‘उपचार’, BMC ने नियुक्त केला ’डॉक्टर’; देशात पहिल्यांदा झाले असे

व्हॅक्सीनेशनसाठी आहात अस्वस्थ, आता Paytm वरून बुक होईल व्हॅक्सीन घेण्यासाठी स्लॉट; जाणून घ्या

15 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे बदलणार नशीब, खिशात येईल पैसा, इतरांसाठी असा आहे मंगळवार